कारमध्ये सुरक्षेसाठी एअरबॅग्स असतात हे तुम्हाला माहिती आहे. पूर्वी काही कार्समध्ये ड्राइव्हरच्या संरक्षणासाठी एअरबॅग असायची मात्र आता काही कार कंपन्यांनी सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स देण्यास सुरुवात केली. एअरबॅग्समुळे कारचा प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. मात्र दुचाकीवरून प्रवास करतांना असुरक्षिततेची चिंता कायम असते. काही घटनांमध्ये हेल्मेट असूनही दुचाकीस्वरांच्या डोक्यास जबर दुखापत होताना आपल्याला दिसते. ही गोष्ट लक्षात घेऊन इटालियन कंपनी एक एअरबॅगसह सज्ज हेल्मेट (Helmet with an Airbag) बाजारात लॉंच केले आहे.
अपघातावेळी असे करेल संरक्षण
एअरहेड ही कंपनी बाजारात हे हेल्मेट लॉंच करेल. या हेल्मेटचे वैशिष्ट्य म्हणजे या हेल्मेटमध्ये अशा एअरबॅग्स असतील ज्या गरजेच्या वेळी उघडतील व दुचाकीस्वाराचे दुखापतीपासून संरक्षण करेल. या हेल्मेटचा बाहेरील भाग असा डीजाइन करण्यात आला आहे की घटनाप्रसंगी एअरबॅग उघडल्यानंतर डोक्याची हालचाल करायला जागा शिल्लक राहते. यामुळे दुचाकीस्वराला जास्त दबाव जाणवत नाही.
लहान मुलांनी हेल्मेट न घातल्यास लागेल 1000 दंड
लहान मुलांना प्रवासात सोबत घेऊन जाण्याचे नियम बदलले आहेत. नव्या वाहतुकीच्या नियमानुसार मुलांनी हेल्मेटसह दुचकीवर हारनेस बेल्ट वापरणे आता बंधनकारक झाले आहे. वाहनाचा वेग ताशी 40 किमी ठेवणे आवश्यक आहे. या नियमाचे पालन न केल्यास 1000 दंड किंवा 3 महिन्यासाठी परवाना ( Licenced) रद्द केला जाऊ शकतो.