देशातील महत्त्वाच्या बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. एचडीएफसी बॅंकेने महिन्याभराच्या काळात होम लोनच्या व्याजदरात तिसर्यांदा रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) वाढ केली आहे. मे महिन्याते बॅंकेने दोनदा दर वाढवून एकूण 35 बेसिस पॉइंट्ने वाढ केली होती. एचडीएफसी बॅंकेसोबतच आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि पंजाब नॅशनल बँकेने (PNB) किरकोळ किमतीवर आधारित कर्ज दर (MCLR) वाढवले आहेत.
एचडीएफसी बॅंकेने, बेंचमार्क कर्ज दर 5 बेस पॉईंटने वाढवला आहे. यामुळे नवीन आणि सध्या सुरू असलेल्या कर्जदारांच्या ईएमआयमध्ये (EMI) वाढ होईल. बॅंकेने 1 जून, 2022 पासून होम लोनवरील किरकोळ प्राईम लेंडिंग रेट (RPLR) 5 बेस पॉइंटने वाढवला आहे. म्हणजेच एचडीएफसीने गेल्या महिन्याभराच्य काळात होन लोनवरील व्याज दरात 40 बेस पॉईंटने वाढ केली आहे. त्यामुळे बॅंकेचा व्याज दर 7.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. जो पूर्वी 7 टक्के होता.
एचडीएफसी बॅंकेसोबतच आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बॅंक ऑफ इंडिया (BOI) या बॅंकांनीही त्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. आयसीआयसीआय बॅंकेचा किमान व्याज दर 7.30 टक्के तर पीएनबी बॅंकेचा व्याज दर 6.75 टक्के झाला आहे. पीएनबी बॅंकेने 15 बेस पॉईंटने वाढ केली आहे. नवीन व्याज दर 1 जून, 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर 1 जून, 2022 पासून एमसीएलआर (MCLR) दरात बदल केले आहेत.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
पंजाब नॅशनल बँकेने (PNB), सरकारी मालकीची बँक, निधी-आधारित कर्जाच्या किरकोळ खर्चाच्या दरात 15 आधार अंकांनी वाढ केली. PNB वेबसाइटनुसार वाढलेले दर 1 जूनपासून लागू होतील.
बँक ऑफ इंडिया (BOI)
बँक ऑफ इंडियाने 1 जून, 2022 पासून व्याज दरात किरकोळ वाढ केली आहे.
रिझर्व्ह बॅंकेने (RBI) रेपो दरामध्ये वाढ केल्यामुळे पुन्हा एकदा बॅंकांनी व्याजदरात (Bank Interest Rates) वाढ करण्यास सुरूवात केली.