कर बचत आणि नियमित चांगला परतावा देणाऱ्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्समधील निवडक म्युच्यु्अल फंड योजनांमध्ये एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंडाचा समावेश होतो. एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंडाने सुरुवातीपासून सरासरी 19.93% रिटर्न दिला आहे.
एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंडाची सुरुवात 2 एप्रिल 1996 रोजी झाली. तेव्हापासून या फंडाची कामगिरी पाहिली तर या फंडातून गुंतवणूकदारांना वार्षिक तब्बल 9418.41% रिटर्न मिळाला आहे. 1 वर्षाचा विचार केला तर 19.93%, 3 वर्षात 28.11%, 5 वर्षात 13.03% रिटर्न मिळाला आहे. 10 वर्ष मुदतीत या फंडाने 15.48% रिटर्न दिला आहे.
आयकर नियमानुसार इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक 1.5 लाख रुपयांची कर वजावट मिळते. एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंडाची एनएव्ही 22 सप्टेंबर 2023 रोजी 951.84 रुपये इतकी आहे. या फंडाकडील एकूण मालमत्ता 11285.76 कोटी इतकी आहे.
एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंडाने 95.64% गुंतवणूक भारतीय कंपन्यांमध्ये केली आहे. त्यात 67.45% गुंतवणूक लार्ज कॅप स्टॉक्समध्ये केली असून 9.3% गुंतवणूक मिडकॅप स्टॉक्समध्ये केली आहे. तीन वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा कर बचत आणि चांगला रिटर्न असा दुहेरी लाभ देणारा फंड आहे.
एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने मागील तीन वर्षात 28.10% रिटर्न दिला आहे. आतापर्यंत या योजनेतून गुंतवणूकदारांना सरासरी 19.93% परतावा मिळाला आहे. ईएलएसएस श्रेणीचा बेंचमार्क निफ्टी 50 टीआरआय निर्देशांकाने 13.54% परतावा दिला. तर ईएलएसएस श्रेणीचा सरासरी परतावा 15.79% इतका होता.
एसआयपीच्या माध्यमातून दरमहा किमान 500 रुपयांची गुंतवणूक सुरु करता येईल. एसआयपीने गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना देखील या फंडाने दमदार परतावा दिला आहे. 1 वर्ष एसआयपी करणाऱ्यांना फंडातून 14.17% रिटर्न मिळाला. 3 वर्षात 38.26% आणि 5 वर्षात 63.64% परतावा मिळाला आहे. 10 वर्ष दरमहा 1000 रुपयांची एसआयपी केल्यास आजच्या घडीला या फंडातील एकूण रक्कम 246806 रुपये इतकी वाढली. यातून गुंतवणूकदाराला सरासरी 105.67% इतका परतावा मिळाला.