HDFC Bank MCLR Rates : HDFC बँकेने फंड बेस्ड लेंडिंग रेट्सची मार्जिनल कॉस्ट (MCLR) 15 बेस पॉईंट्सनी वाढवली आहे. एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर 7 जून 2023 पासून लागू झालेले आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने MCLR (Marginal Cost of the Fund-Based Lending Rate) दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांनी घेतलेल्या कर्जावर होणार आहे. आता ग्राहकांना त्यांनी घेतलेल्या कर्जावर आधीपेक्षा जास्त व्याज द्यावे लागणार आहे.
MCLR दर कितीने वाढला?
HDFC बँकेने रात्रीचा MCLR दर 15 bps (Basis Points) ने वाढवून 8.10 % केला आहे. HDFC बँकेचा एक महिन्याचा MCLR 10 bps ने वाढून 8.20% वर पोहोचला आहे. तर तीन महिन्यांचा MCLR 8.50% झाला आहे, जो पूर्वीच्या 8.40% पेक्षा 10 बेस पॉइंट्स जास्त आहे.
त्याचप्रमाणे सहा महिन्यांच्या एमसीएलआरमध्ये 5 बेस पॉइंट्सने वाढ झाली आहे, ती 8.80% वरून 8.85% झालेली आहे. तथापि, एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असलेल्या MCLR मध्ये कोणताही बदल झालेला नाही, तो 9.05% कायम ठेवण्यात आला आहे. दोन वर्षांच्या एमसीएलआर साठी 9.10% टक्के आणि तीन वर्षांच्या एमसीएलआर साठी 9.20 % टक्के दर कायम ठेवण्यात आला आहे.
याआधी कधी वाढविले बँकेने दर
मे महिन्यात देखील एचडीएफसी बँकेकडून निवडक कालावधीसाठी एमसीएलआर दर 15 बेसिस पॉइंट्सने वाढवण्यात आला होता. त्यावेळी बँकेने रातोरात MCLR 7.80 % वरुन 7.95 % पर्यंत वाढविला होता. 1 महिन्यासाठीचा MCLR 7.95 वरुन 8.10 टक्क्या पर्यंत वाढविला होता. त्याचवेळी MCLR दर 3 महिन्यांसाठी 8.40 %, 6 महिन्यांसाठी 8.80 %, 1 वर्षासाठी 9.05 %, 2 वर्षांसाठी 9.20 % आणि 3 वर्षांसाठी 9.20 % इतका वाढवण्यात आला होता.
तर एप्रिल महिन्यात बँकेने काही ठराविक कालावधीसाठी MCLR मध्ये ८५ बेसिस पॉइंट्सची कपातही केली होती.
कोणत्या कर्जदारांवर होईल परिणाम
बँकेने वाढवलेल्या MCLRचा गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. तर याचा परिणाम वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवरच दिसून येईल. येत्या काही दिवसांत ICICI बँक, बँक ऑफ इंडिया आणि PNB कडून MCLR वाढवला जाऊ शकतो.