क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग आणि बिल पेमेंट केल्यावर डिस्काउंट आणि ऑफर्स मिळतात हे सर्वांना माहिती आहे. मात्र, महिलांसाठी खास क्रेडिट कार्डवरून जर तुम्ही शॉपिंग करत असाल तर तुमचा आणखी फायदा होऊ शकतो. जर तुम्ही वूमनसाठी स्पेशल बेनिफिट देणाऱ्या क्रेडिट कार्डच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.
देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या HDFC आणि कोटक महिंद्रा बँक महिलांसाठी खास क्रेडिट कार्ड घेऊन आल्या आहेत. या कार्डवर रेग्युलर कार्डपेक्षा जास्त रिवॉर्ड पॉइंट्स आणि ऑफर्स मिळू शकतात. या दोन्ही बँकांच्या कार्डबद्दल माहिती पाहू.
HDFC बँक क्रेडिट कार्ड (Solitaire Credit Card benefit)
HDFC बँकेकडून खास महिलांसाठी सॉलिटियेर क्रेडिट कार्ड आणण्यात आले आहे. या कार्डद्वारे प्रत्येक 150 रुपयांच्या खर्चावर 3 रिवॉर्ड पॉइंट मिळतील. तसेच हॉटेल बिल (डायनिंग आऊट) आणि किराणा शॉपिंगवर 50% आणखी रिवॉर्ड पॉइंट मिळतील. गिफ्ट आणि ऑफर्सला लाभ मिळवण्यासाठी हे रिवॉर्ड पॉइंट वापरता येतील.
दर सहा महिन्याला खर्चाचा माइलस्टोन पार केल्यानंतर कॅश व्हॉऊचर्सही मिळतात. मिळालेले रिवॉर्ड पॉइंट तुम्ही कार्डचे बिल पेमेंट करतानाही वापरू शकता.
गाडीमध्ये इंधन भरताना 1% सरचार्जवर सूट मिळेल. या क्रेडिट कार्डला वार्षिक शुल्क 500+(GST) आहे. वर्षात 50, हजारांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्यास पुढील वर्षाचे शुल्क माफ होईल. कार्डबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या लिंकवर मिळेल.
कोटक बँक क्रेडिट कार्ड (Silk Inspire Credit Card benefit)
कोटक बँकेद्वारे खास महिलांसाठी क्रेडिट कार्ड ऑफर करण्यात येते. सिल्क इन्स्पायर क्रेडिट कार्डद्वारे महिलांच्या कपड्यांच्या शॉपिंगवर रिवॉर्ड पॉइंट मिळतात. प्रत्येक 100 रुपये खर्च केल्यास 5 पट रिवॉर्ड पॉइंट्स म्हणजे 5 रिवॉर्ड पॉइंटही मिळू शकतात. 1 रिवॉर्ड पॉइंट म्हणजे 1 रुपया. मात्र, महिन्याच्या बिलिंग सायकलमध्ये एकूण शॉपिंग 7,500 रुपये हवी.
इतर गोष्टींसाठी शॉपिंग केल्यास प्रत्येक 200 रुपये खर्च केल्यास 1 रिवॉर्ड पॉइंट मिळेल. तिकिट बुकिंग, हॉटेल, मूव्हीसाठी तिकिट बुक करताना डिस्काउंट मिळेल. इंधन भरतानाही डिस्काउंट मिळेल.
जर तुमचे कार्ड चोरीला गेले तर 75 हजार रुपयांपर्यंत संरक्षण मिळेल. मात्र, सात दिवसांच्या आत बँकेला कळवणे अनिवार्य आहे. म्हणजे कार्ड चोरीला गेल्यावर कोणी खर्च केले तरी बिल माफ होईल.
क्रेडिट कार्ड नोंदणी शुल्क 599 रुपये आहे. तर वार्षिक शुल्क 599 रुपये आहे. एका वर्षात 1 लाख 25 हजार रुपये खर्च केल्यास वार्षिक शुल्क माफ होईल. कार्डबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या लिंकवर पाहायला मिळेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            