Shivangi Joshi New Car: 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री 'शिवांगी जोशी' हिने नुकतेच एक लग्झरी कार खरेदी केली आहे. तिने कोणती गाडी खरेदी केली व त्याची काय किंमत आहे, हे जाणून घेवुयात.
Shivangi Joshi Latest News: अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) ही सध्या खूप आनंदात आहे. तिने नुकतेच स्वत:लाच एक नवीन कार भेट म्हणून दिली आहे. सुश्मिता सेन (Sushmita Sen) पाठोपाठ शिवांगी जोशीची गाडीदेखील खूप चर्चेत आहे. शिवांगीच्या या गाडीचे फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या या नवीन कारविषयी अधिक जाणून घेवुयात.
शिवांगी जोशीने कोणती कार खरेदी केली?(Which Car did Shivangi Joshi Buy)
टी.व्ही इंडस्ट्रीची प्रसिध्द अभिनेत्री शिवांगी जोशी हिने ‘मर्सिडीज बेंज’ (Mercedes Benz) ही नवीन कार खरेदी आहे. तिच्या या गाडीची किंमत सुमारे 57 लाख रूपये आहे. ही गाडी तिने स्वत:ला गिफ्ट केली असल्याचे तिने सोशलमिडीयावर एका पोस्टच्या माध्यमातून शेयर केले आहे. तसेच गाडीसोबत तिने एक फोटो शेयर केला असून, या फोटोमध्ये ती पिंक व व्हाइट कलरच्या वन शोल्डर शार्ट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिच्यासोबत या फोटोमध्ये तिचे कुटुंब पाहायला मिळत आहे. अवघ्या चोवीस वर्षात तिने ही लक्झरी कार खरेदी केली आहे.
शिवांगी जोशीविषयी..(About Shivangi Joshi..)
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून शिवांगी जोशीला प्रसिध्दी मिळाली आहे. तिची या मालिकेतील ‘नायरा’ ही भूमिका फार गाजली होती. तसेच ती नुकतीच ‘खतरो के खिलाडी’(Khatron Ke Khiladi) या रियालिटी शो मध्ये देखील पाहायला मिळाली होती. तसेच ती 'बालिका वधू 2' (Balika Vadhu 2)या मालिकेत ही झळकली. याव्यतिरिक्त ती म्युझिक अल्बममध्येदेखील दिसली होती.