Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Post Franchise Scheme: 8 वी पास आहात? मग 5 हजारांत स्वतःचा व्यवसाय सुरु करा

Indian Post Franchise Scheme

Indian Post Franchise Scheme: तुम्ही 8 वी उत्तीर्ण असाल, तर अगदी 5000 रुपयांमध्ये भारतीय पोस्ट खात्याची फ्रँचायझी घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. त्येक गावांत-शहरात टपाल सेवा सुरू करण्याच्या उद्देशाने, टपाल विभागाकडून दोन प्रकारच्या फ्रँचायझी दिल्या जातात.

Indian Post Franchiese Scheme: कोपऱ्या-कोपऱ्यावर लागलेल्या लाल डब्यांमध्ये टाकलेले पत्र अखंड भारतवर्षाच्या सुदूर टोकांवरील शेवटच्या मानवी वस्ती आणि सैनिकी तळांपर्यंत पोहाचविणारे खाते म्हणजे भारतीय टपाल खाते (अर्थात Indian Postal Department). पोस्ट-ऑफिस हे देशातील सर्वात विश्वसनीय सरकारी संस्थांपैकी एक आहे. देशातील करोडो लोक बचत, गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट-ऑफिसावर अवलंबून आहेत. शरीरातील रक्त-वाहिन्यांप्रमाणे पोस्ट-ऑफिसचे जाळेही देशभर पसरलेले आहे. असे असले तरीदेखील, देशाच्या ज्या भागांत कनेक्टिव्हिटी तुलनेने चांगली नाही, त्या ठिकाणी देखील आपल्या नेटवर्कचा विस्तार व्हावा, या हेतूने इंडियन पोस्टने “फ्रँचायझी सेवा” सुरू केली आहे. तुम्ही 8 वी उत्तीर्ण असाल, तर अगदी 5000 रुपयांमध्ये भारतीय पोस्ट खात्याची फ्रँचायझी घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. फ्रँचायझी घेण्यासाठी द्यावी लागणारी ही अनामत रक्कम म्हणजे Security Amount असते.

पोस्टाच्या फ्रँचायझीचे प्रकार

प्रत्येक गावांत-शहरात टपाल सेवा सुरू करण्याच्या उद्देशाने, टपाल विभागाकडून दोन प्रकारच्या फ्रँचायझी दिल्या जातात.

फ्रँचायझी आउटलेटस् 

केवळ काउंटर सेवा पुरविल्या जातात, बाकी इतर सेवा-सुविधा वितरण आणि प्रसारणाची जबाबदारी पोस्ट खात्याची असते. कमिशन-बेस्ड व्यवसाय असतो. ज्या ठिकाणी पोस्ट-ऑफिस ओपन केले जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी या प्रकारची फ्रँचायझी दिली जाते.

पोस्टल एजंट फ्रँचायझी 

या  फ्रँचायझी अंतर्गत टपाल तिकीट आणि स्टेशनरीची विक्री केली जाते आणि ही सुविधा शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत दिली जात असल्याने, ज्या व्यक्तींना फ्रँचायझी घेण्यासाठी अर्ज करायचा आहे, त्यांना शहरी आणि ग्रामीण भागातून एक विभाग निश्चित करावा लागतो. फक्त टपाल तिकिटे आणि स्टेशनरी वस्तू विकल्या जाऊ शकतात. आणि त्यासाठी पोस्टल एजंटला, वेळोवेळी त्याच्या जवळच्या पोस्ट ऑफिसात जाऊन, टपाल तिकिटे आणि स्टेशनरी खरेदी करावी लागते आणि त्यानंतरच त्याची विक्री करता येते.

पोस्टाच्या वेगवेगळ्या प्रोडक्टसवर मिळणार कमिशन

पोस्ट ऑफिस आउटलेट घेतल्यानंतर, तुम्ही पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज्, पेमेंट सेवा, स्पीड पोस्ट आर्टिकल्स, रजिस्टर्ड पोस्ट्स, स्टॅम्प्स, स्टेशनरी, ई-गव्हर्नन्स प्रोजेक्ट्स सारख्या प्रॉडक्ट्सची विक्री करू शकता आणि एक चांगली रक्कम कमवू शकता. मनीऑर्डरच्या बुकिंगवर 100 ते 200 रुपयांपर्यंत 3.50 रुपये कमिशन, तर 200 रुपयांपेक्षा जास्त मनी-ऑर्डरच्या बुकिंगवर 5 रुपये कमिशन, रिटेल सर्व्हिसेसवर 40 टक्के तर टपाल तिकीट, पोस्टल स्टेशनरी आणि मनी ऑर्डर फॉर्मच्या विक्रीवर विक्री रकमेच्या 5 टक्के कमिशन, तसेच दर महिन्याला 1000 पेक्षा जास्त रजिस्ट्री किंवा स्पीड पोस्ट आर्टिकलसाठी 20% अतिरिक्त कमिशन देखील मिळू शकते.

फ्रँचायझीसाठी फक्त 5 हजार रुपये अनामत रक्कम

बेसिक गुंतवणुकीचा विचार करता, “फ्रँचायझी आउटलेट” पोस्टल एजंट्सपेक्षा थोड्या किफायतशीर आहेत. मात्र स्टेशनरीकरिता थोडा खर्च करावा लागत असल्याने “पोस्टल एजंट फ्रँचायझी” तुलनेने महाग आहेत. “पोस्ट ऑफिस फ्रँचायझी” ऑफिससाठी किमान 200 चौरस फूट जागा असणे आवश्यक असते. यासोबतच, नियमानुसार पोस्ट विभागाने निश्चित केलेली किमान सुरक्षा ठेव रक्कम 5000 रुपये निश्चित जमा करावी लागते.

फ्रँचायझीसाठी 8वी पर्यंतचे शिक्षण हवे

पोस्ट-ऑफिससाठी फ्रँचायझी घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे, तर कमाल वयावर कोणतीही मर्यादा नाही. ज्या व्यक्तींनी मान्यताप्राप्त शाळेतून किमान 8 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे, त्या सर्व व्यक्ती फ्रँचायझी घेण्यास पात्र आहेत. फ्रँचायझीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीसोबत पोस्ट ऑफिसद्वारे फ्रँचायझी संबंधित करार केला जातो. फ्रँचायझी सुरू करण्यापूर्वी, त्या व्यक्तीला पोस्ट ऑफिसमध्ये कसे काम केले जाते, याचे प्रशिक्षण देखील दिले जाते.

अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

पोस्ट-ऑफिस फ्रँचायझी घेण्यासाठी, इच्छूक व्यक्तीला “ऑफलाइन मोड”द्वारे अर्ज करावा लागेल. पोस्ट ऑफिस फ्रँचायझीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने www.indiapost.gov.in या संकेतस्थळावरील या अधिकृत लिंकला भेट द्यावी आणि या साईटवर दिलेला फॉर्म डाउनलोड करावा. स्वतःचे नाव, वय, राहण्याचा पत्ता, फ्रँचायझी सुरु करावयाच्या ठिकाणाचे तपशील, अशी अगदी बेसीक माहिती भरल्यानंतर, तुम्हाला हा फॉर्म ज्या भागात तुमची फ्रँचायझी उघडायची आहे, त्या विभागाच्या पोस्ट विभागीय कार्यालयाच्या टपाल विभागाच्या अधीक्षकांकडे सबमिट लागेल.

आवश्यक कागदपत्रे

पोस्ट-ऑफिस फ्रँचायझी घेण्यासाठी अर्जासोबत तुमच्या वयाचा पुरावा देणारे प्रमाणपत्र (जसे - आधार कार्ड, जन्म-दाखला), 10वी ची मार्कशीट (10वी उत्तीर्ण असल्यास), पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासाचा पुरावा, इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तींना संगणकाचे चांगले ज्ञान असल्यास अशा व्यक्तींना प्राधान्य दिले जाते.

यानंतर, ASP (सहाय्यक अधीक्षक) / SDI (उपविभागीय निरीक्षक) यांच्या अहवालाच्या आधारे, संबंधित विभागीय अधिकारी तुमच्याद्वारे सादर केलेल्या फ्रँचायझीसाठीच्या अर्जावर विचार करतील आणि गुणवत्तेनुसार 14 दिवसांच्या आत फ्रँचायझी निवडतील. यानंतर तुम्ही तुमची सेवा देणे सुरू करू शकता. तुम्ही दिलेल्या प्रत्येक सेवेसाठी तुम्हाला कमिशन मिळते, ज्यामुळे तुमची भरपूर कमाई होते.