• 02 Oct, 2022 09:37

Harsha Engineers IPO: जाणून घ्या कधी उघडणार, इश्यूची किंमत काय?

Harsha Engineers IPO

Harsha Engineers IPO: हर्षा इंजिनिअरिंग कंपनीने 300 कोटींचे शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale) द्वारे तर 455 कोटी रुपयांचे शेअर फ्रेश इश्यू म्हणून विकणार आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 755 कोटी रुपये उभारण्याची तयारी केली.

देशातील सर्वांत मोठ्या बेअरिंग केजची निर्मिती करणाऱ्या हर्षा इंजिनिअरिंग (Harsha Engineering) कंपनीचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) 14 सप्टेंबर ओपन होणार असून तो 16 सप्टेंबरपर्यंत खुला असणार आहे. हर्षा इंजिनिअरिंगच्या इश्यूची किंमत 314 ते 330 रुपये निश्चित करण्यात आली. हर्षा इंजिनिअर्सच्या इश्यूचा ग्रे मार्केट प्रीमियम (Grey Market Premium-GMP) गेल्या काही दिवसात वाढला. 9 सप्टेंबरला कंपनीचा GMP 150 रुपयांवर होता. तो 10 सप्टेंबरला म्हणजे शनिवारी 200 रुपयांपर्यंत वाढला.

कंपनी आयपीओद्वारे किती निधी उभारणार?

हर्षा इंजिनिअरिंग कंपनी या आयपीओमधून 755 कोटी रुपये उभारणार आहे. यापैकी 300 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale) द्वारे तर 455 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू विकले जाणार आहेत. ऑफर फॉर सेलद्वारे राजेंद्र शाह 66.75 कोटी रुपये, हरीश रंगवाला 75 कोटी रुपये, पिलक शाह 16.50 कोटी रुपये, चारुशीला रंगवाला 75 कोटी आणि निर्मला शाह 66.75 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत.


निधीचा विनियोग कसा करणार?

हर्षा इंजिनिअर्स कंपनी नवीन इश्यूच्या विक्रीमधून मिळालेल्या रकमेतून 270 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड, मशिनरी विकत घेण्यासाठी 77.95 कोटी रुपये आणि पायाभूत सुविधा, नूतनीकरण (Renovation), व कॉर्पोरेट गोष्टींची पूर्तता करण्यासाठी 7.12 कोटी रुपये खर्च करणार आहे.

हर्षा इंजिनिअर्सची वाटचाल!

हर्षा इंजिनिअरिंग कंपनी ही गुजरातमधील अहमदाबाद येथील असून 1986 मध्ये राजेंद्र शाह आणि हरीश रंगवाला यांनी कंपनीची स्थापना केली. कंपनी ऑटोमोटिव्ह, एव्हिएशन, खाणकाम, रेल्वे बांधकाम, शेती आणि इतर औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे. यापूर्वीही कंपनीनी आयपीओ आणण्याचा प्रयत्न केला होता. ऑगस्ट, 2018 मध्ये कंपनीने सेबीकडे कागपत्रेही जमा केली होती. अॅक्सिस कॅपिटल, इक्विरस कॅपिटल आणि जेएम फायनान्शिअल हे या आयपीओचे मॅनेजर्स आहेत.

मार्च, 2022 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 1321.48 कोटी रुपयांचा महसूल आणि 91.94 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. कंपनीच्या महसुलात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 45.44 टक्क्यांनी वाढ नोंदवली.