Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Harley-Davidson X440: रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी भारतात हार्ले डेविडसनची बाईक लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Harley-Davidson X440 Launch

Image Source : www.autocarindia.com

Harley-Davidson X440 Launch: आज भारतीय बाजारपेठेत हार्ले डेविडसन कंपनीची 'Harley-Davidson X440' ही नवीन बाईक लॉन्च करण्यात आली. ही बाईक रॉयल एनफिल्डला तगडी स्पर्धा देणार आहे. या बाईकची बुकिंग आजपासून सुरु झाली आहे. यानिमित्ताने या बाईकचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

आज 4 जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत हार्ले डेविडसन कंपनीने त्यांची 'Harley-Davidson X440' ही नवीन बाईक लॉन्च केली. ही बाईक हार्ले डेविडसन कंपनीने हिरो मोटोकॉर्पसोबत (Hero MotoCorp) पार्टनरशिप करून भारतात तयार केली आहे. त्यामुळे ही बाईक पूर्णतः मेड इन इंडिया (Made in India) आहे. आजपासूनच या नवीन बाईकची बुकिंग सूरु करण्यात आली आहे. केवळ 5 हजार रुपयांचे टोकन देऊन ग्राहक ही बाईक बुक करू शकतात. 'Harley-Davidson X440' ही बाईक रॉयल एनफिल्डला (Royal Enfield) तगडी स्पर्धा देणार आहे. या बाईकचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

'Harley Davidson X440' चे फीचर्स जाणून घ्या  

Harley Davidson X440 च्या टॉप व्हेरियंटमध्ये 3.5-इंच TFT स्पीडोमीटर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी (Bluetooth connectivity) देण्यात आली आहे. यासोबतच या बाईकला 13.5 लीटरची इंधनासाठी टाकी देण्यात आली आहे.

Harley Davidson X440 या बाईकमध्ये 440cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. ज्यामुळे बाईकला 38 PS ची पॉवर आणि 30 Nm चा पीक टॉर्क मिळणार आहे.

Harley Davidson X440 बाईकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. तसेच एलईडी लाइटिंग, हेडलाइटमध्ये मायनस शेपचा एलईडी डीआरएल, सिंगल पॉड डिजिटल अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले गेले आहे. त्यासोबत अलॉय व्हील, ट्यूबलेस टायर्स ही देण्यात आली आहेत.

Harley Davidson X440 बाईकच्या पुढील बाजूस 18 इंच टायर आणि मागील बाजूस 17 इंचाचा टायर देण्यात आला आहे.

या बाईकमधील सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये पुढील बाजूस फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल शॉक अब्जॉर्बर देण्यात आले आहेत.

किंमत जाणून घ्या

'Harley Davidson' कंपनीने X440 बाईक 3 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. ही बाईक डेनिम (Denim), विविड (Vivid) आणि एस (S) या व्हेरियंटमध्ये ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. डेनिम व्हेरियंटची किंमत 2.29 लाख रुपये असणार आहे. तर विविड व्हेरियंटसाठी 2.49 लाख रुपये आणि एस व्हेरियंटसाठी 2.69 लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे.

बुकिंग कुठे करायची?

तुम्हाला देखील हार्ले डेविडसन कंपनीची 'Harley Davidson X440' ही बाईक खरेदी करायची असेल, तर त्यासाठी आजपासूनच बुकिंग सुरु करण्यात आली आहे. ग्राहक केवळ 5000 रुपयांमध्ये ही बाईक बुक करू शकतात. या बाईकची बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात येत आहे.

Source: zeebiz.com