Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Harley Davidson: Harley Davidson X440 मॉडेल तीन वेरिएंट्ससह लाँच, ऑक्टोबर पासून होणार डिलिव्हरी

Harley Davidson X440 Model Launched

Image Source : www.economictimes.indiatimes.com

Harley Davidson X440 Model Launched: अमेरिकन कंपनी Harley Davidson ने भारतीय कंपनी Hero MotoCorp च्या सहकार्याने आपली पहिले मॉडेल Harley Davidson X440 मोटरसायकल बाजारात आणली आहे. Hero MotoCorp ने गेल्या मंगळवारपासून देशभरात Harley Davidson X440 मॉडेलचे 5000 रुपयांपासून बुकिंग सुरू केले आहे. कंपनी ऑक्टोबरपासून ग्राहकांना डिलिव्हरी देणे सुरु करणार आहे.

Deliveries Start From October: Harley Davidson X440 मोटरसायकल देशभरात तीन वेरिएंट्ससह लाँच करण्यात आली आहे. या मॉडेलची डिलिव्हरी ऑक्टोबर 2023 पासून सुरू केली जाणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली.

काय आहे किंमत?

डेव्हिडसन X440 मॉडेल देशभरात तीन वेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आले आहे. हे प्रकार म्हणजे डेनिम, विविड आणि एस. या तिन्ही वेरिएंट्सची किंमतही वेगवेगळी आहे. डेनिमसाठी 2.29 लाख, विविडसाठी 2.49 लाख आणि एसकेसाठी 2.69 लाख रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे.

कसे कराल बुकिंग?

ऑनलाइन बुकिंग व्यतिरिक्त, कंपनी आपल्या ग्राहकांना आरक्षित करण्याची सुविधा देत आहे. म्हणजेच, तुम्ही तुमच्या जवळच्या Harley Davidson डीलरशिप किंवा Hero MotoCorp आउटलेटला भेट देऊन तुमचे Harley Davidson X440 मॉडेल बुकिंग करू शकता.

रॉयल एनफिल्ड सोबत स्पर्धा

Harley Davidson आणि Hero MotoCorp या दोघांनी संयुक्तपणे 440 cc इंजिन प्रकारातील Harley Davidson X440 मॉडेल सादर केले आहे. हे मॉडेल लाँच केल्यापासून रॉयल एनफिल्ड कंपनीला तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. Hero MotoCorp कंपनी हार्ले डेव्हिडसन ब्रँडसह देशातील आपल्या प्रीमियम बाईक मालिका लाँच करीत आहे.

भारतात वाजवी दरात उपलब्ध

Harley Davidson X440 मॉडेलची खास गोष्ट म्हणजे हार्ले डेव्हिडसनने भारतीय कंपनीच्या सहकार्याने हे मॉडेल पहिल्यांदाच तयार केले आहे. हार्ले डेव्हिडसन बाईक खूप महाग आहेत. परंतु, हार्ले डेव्हिडसन X440 हे मॉडेल भारतात लॉन्च करण्यात आले आहे, ते अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहे.