भारत सरकार लवकरच एक नवीन ऑपरेटिंग सिस्टिम INDos लॉंच करण्याच्या तयारीत आहे. ही ऑपरेटिंग सिस्टिम अँन्ड्रॉईड आणि अॅपलच्या आयओएस ऑपरेटिंग सिस्टिम्सला (IOS) टक्कर देऊ शकते. मोबाईल मार्केटमध्ये Android vs IOS व्यतिरिक्त अजून एका ऑपरेटिंग सिस्टीमचा पर्याय उपलब्ध असेल. स्मार्टफोनच्या बाजारपेठेत दोन ऑपरेटिंग सिस्टिमचे वर्चस्व आहे. यात IPhoneसह IOS चा समावेश आहे. बलाढ्य आयटी कंपन्यांच्या ऑपरेटिंग सिस्टिमला भारतीय बनावटीची देशी OS कशी टक्कर देते हे येत्या काळात समजेल.
INDOs हे नाव असण्याची शक्यता
गुगल अँन्ड्रॉईड या ऑपरेटिंग सिस्टिमचा मार्केट शेअर 97 टक्के इतका आहे. तुलनेने ॲपल IOSचा शेअर खूपच आहे. वृत्तानुसार या ऑपरेटिंग या सिस्टिमला IndOS हे नाव देण्यात आले आहे. या सिस्टिमला उच्चतम सुरक्षा देण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असेल. गुगल व ओईएमला सुरक्षेसाठी जबाबदारी घ्यावी लागेल.
Android वापरकर्त्यांसाठी असुरक्षित
अँन्ड्रॉईड फोन निर्मात्या कंपन्या सतत वापरकर्त्यांना पुरेशी सुरक्षा पुरविण्यात अपयशी होत आहे. यामुळे अँन्ड्रॉईडला सरकारसमोर अहवाल सादर करणे आव्हानात्मक ठरत आहे. या कंपनीला सरकारकडून दंड ठोठावण्यात आला आहे. अँन्ड्रॉईड गुगल आता पेचात अडकले आहे. भारत सरकारने सुरक्षा द्या नाहीतर निर्बंध लादले जातील अशा कठोर शब्दात गुगलला खडे बोल सुनावले आहे. गुगल विरुद्ध भारतात खटला चालू आहे. नरेंद्र मोदींनी ‘मेड इन इंडिया’ ऑपरेटिंग सिस्टिम लॉंच करणार असल्याचे जाहीर केले आहे.
गुगल व ॲपलला मिळेल आव्हान
भारत हे जगातील सर्वात मोठे स्मार्टफोन मार्केट आहे. भारताला यूजर्सला सुरक्षा देण्यासाठी ही कार्यवाही करावी लागणार आहे. मात्र गुगलवर असलेला हा वाढता दबाव पाहून गूगलने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये गूगलने म्हटलेय ही भारतात आगामी काळात यामुळे मोबाईल फोन खरेदी करणे महाग होऊ शकते.