Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FM Radio E-Auction : 284 शहरात 808 एफएम रेडिओ स्टेशनसाठी सरकार करणार ऑनलाइन लिलाव

FM Radio E-Auction : 284 शहरात 808 एफएम रेडिओ स्टेशनसाठी सरकार करणार ऑनलाइन लिलाव

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नवीन खासगी एफएम स्टेशनचे ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहेत. यामध्ये देशभरातील 288 शहरांमध्ये एकूण 808 एफएम स्टेशन सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

रेडिओ हे प्रसार माध्यमातील एक प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. रेडिओचा श्रोतावर्ग देखील मोठ्या संख्येने आहे. त्यात सरकारकडून खासगी एफएमला (FM Radio) परवानगी दिल्यानंतर हे जाळे अधिकच विस्तारले आणि खेड्या पाड्यापर्यंत माहिती आणि मनोरंजनाचे साधन म्हणून रेडिओचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. त्याच प्रमाणे कम्युनिटी रेडिओचेही जाळे तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून आणखी काही एफएम (FM) स्टेशनसाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

808 एफएम रेडिओ

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नवीन खासगी एफएम सुरू स्टेशन संदर्भात ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील 288 शहरांमध्ये  एकूण 808 एफएम स्टेशन सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

388 एफएम रेडिओ स्टेशन कार्यरत

खाजगी रेडिओ स्टेशन क्षेत्राबद्दल बोलताना ते म्हणाले की, भारतात सध्या 26 राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशांमधील 113 शहरांमध्ये 388 एफएम रेडिओ स्टेशन आहेत. "सरकार आता रेडिओ सेवांचा आणखी विस्तार करण्यासाठी लवकरच 284 शहरांमधील 808 चॅनेलच्या ई-लिलाव करणार आहे. तसेच कव्हरेज आणखी सुधारण्यासाठी सरकार दुर्गम भागातही रेडिओ टॉवर उभारत आहे. टियर-II आणि tier-III शहरांमध्ये FM नेटवर्कचा विस्तार करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.

परवाने मिळवण्याची प्रक्रिया सोपी 

या वर्षाच्या सुरुवातीला, सरकारने ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क डेव्हलपमेंट स्कीम मंजूर केली ज्यामुळे AIR FM ट्रान्समिटर्सचे कव्हरेज वाढणार आहे. दरम्यान, सरकारकडून रेडिओ केंद्र, विशेषत: कम्युनिटी रेडिओ चालवण्यासाठी आवश्यक असलेले परवाने मिळवण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक 13 परवान्यांची संख्या 8 करण्यात आली आहे. तसेच परवाना घेण्यासाठी आता चार वर्ष वाट पाहावी लागणार नसून सहा महिन्यांत परवानगी मिळेल असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.