Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Piped Natural Gas: गॅस सिलिंडर दिसेनासा होणार; पाईपद्वारे LPG थेट किचनमध्ये पोहचणार

Piped Natural Gas Network

Image Source : www.india.com

घरगुती गॅस हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. इंधन दरवाढ झाली की त्याचे पडसाद संपूर्ण देशात दिसून येतात. घरोघरी येणारा सिलेंडर येत्या काळात दिसेनासा होऊ शकतो. कारण पाइपद्वारे थेट किचनमध्ये गॅस पुरवठा करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. सिलेंडरच्या तुलनेत पाइपद्वारे मिळणारा गॅस थोडा स्वस्तही आहे. त्यामुळे इंधनावरील खर्चात नागरिकांची बचत होऊ शकते.

Piped Natural Gas: भारतामध्ये स्वयंपाकासाठी इंधन म्हणून LPG गॅसचा वापर प्रामुख्याने होतो. शहरी आणि ग्रामीण भागातही सिलेंडर पुरवठ्याचे जाळे पसरले आहे. तर मोठ्या शहरांतील काही भागात पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) पोहचवला जातो. येत्या काळात भारतामध्ये सर्वच ठिकाणी पाइपद्वारे घरगुती वापरासाठीचा गॅस पुरवण्याचा करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. भविष्यात सिलिंडरच्या टाक्या घेऊन फिरणारी वाहनं दिसेनाशी होऊ शकतात. कारण, LPG थेट पाइपद्वारे तुमच्या घरात येईल. प्रमुख शहरांसोबतच निमशहरी भागातही हे जाळे पसरवण्यात येईल.

सध्या सिलिंडरच्या किमती 1000 रुपयांच्या वर पोहोचल्या आहेत. अशावेळी पाईप्ड गॅस आला तर महिन्याला तुमच्या घरगुती वापरानुसार तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतील. 

31 डिसेंबर 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात पाइपद्वारे गॅस पुरवठा होतो अशी 1 कोटी कनेक्शन आहेत. 2030 पर्यंत ही कनेक्शन 12 कोटींपेक्षाही जास्त नेण्याचे नियोजन केंद्र सरकारने आखले आहे. (Piped Natural Gas Network) त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तीन प्रमुख गॅस वितरण कंपन्यांना हाताशी धरण्यात येणार आहे. तसेच खासगी क्षेत्रातील गॅस पुरवठा कंपन्यांही या स्पर्धेत असतील. टप्प्याटप्प्याने सिलिंडरद्वारे मिळणारा गॅस पुरवठा कमी करून पाइप्सचे जाळे उभारण्यास नव्याने उभ्या राहिलेल्या हाऊसिंग टाइनशिपमध्ये सुरुवात झाली आहे.

सिलिंडरवर सबसिडी मिळते का?

सिलिंडरद्वारे मिळणाऱ्या LPG गॅसवर सरकारकडून 6 हजार 100 कोटी अनुदान देण्यात येते. हे अनुदान प्रामुख्याने प्रधान मंत्री उज्वला योजने ((PMUY) अंतर्गत येणाऱ्या कनेक्शन्सला मिळतात. गॅसचे दरवाढ होत असली तर तीन सरकारी इंधन कंपन्या तोट्यात आहेत. त्यामुळे अर्थसंल्पातून या कंपन्यांना 22 हजार कोटींची मदत केली. (Gas cylinders  may discontinued) जर या कंपन्यांना मदत केली नसती तर सिलिंडर आणखी महागला असता. मात्र, सध्या असलेल्या सिलिंडरच्या किंमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

सिलिंडर की पाइपद्वारे मिळणारा गॅस स्वस्त

सध्या 14 किलोचे घरगुती सिलिंडर सुमारे 1100 रुपयांना मिळते. विविध राज्ये आणि शहरांनुसार यात थोडा बदल असू शकतो. तर पाइपद्वारे मिळणारा गॅस सुमारे 40 रुपये स्टँडर्ड क्युबिक मीटर या दराने मिळतो. यामध्येही शहरानुसार दर बदलू शकतात. दिल्लीमध्ये नुकतेच Indraprastha Gas Ltd (IGL) या पुरवठादार कंपनीने सुमारे 6 रुपयांची दरवाढ केली. असे असले तरी सिलिंडरपेक्षा पाइपद्वारे घरात येणारा गॅस स्वस्त मिळतो.

PNG ची मागणी कमी होतेय?

मागील काही दिवसांपासून पाइपद्वारे दिल्या जाणाऱ्या गॅसची डिमांड कमी झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्याही विचारात पडल्या आहेत. नुकतेच PNG क्षेत्रातील कंपन्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली. देशात पाइपद्वारे गॅस पुरवठा वाढवण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली.

केंद्र सरकारने पाइद्वारे गॅस पुरवठा वाढवण्यासाठी देशातील 297 भौगोलिक क्षेत्रांची निवड केली आहे. या भागातील 98% जनतेला पाइपद्वारे गॅस पुरवठा करण्याचे नियोजन आखले आहे. या क्षेत्रात येणारी शहरे आणि निमशहरांमध्ये गॅस पुरवठ्याचे जाळे उभारण्यात येणार आहे.