पंतप्रधान जनधन योजनेला (janDhan scheme) 9 वर्ष पुर्ण झाली आहेत. या योजनेच्या माध्यमातून उघडण्यात आलेल्या खात्यांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. गेल्या 9 वर्षात तब्बल 50.90 कोटी नागरिकांनी जनधन योजनेअंतर्गत खाती उघडण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून या योजनेतील खाते धारकांना देण्यात येणाऱ्या सुविधेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे पंतप्रधान जन धन योजना?
पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) ही योजना ऑगस्ट 2014 मध्ये भारतातील सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून खातेधारकला झिरो बँलन्सवर बँकेमध्ये खाते उघडता येते. या खात्याच्या माध्यमातून कोणतेही आर्थिक व्यवहार करणे, बचत आणि मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवता येतात. तसेच सरकारच्या कोणत्याही योजनेची सबसि़डी ही Direct Benefit Transfer (DBT) योजनेअंतर्गत जनधन खात्यामध्ये जमा केली जाते.याच बरोबर जनधन योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. तसेच या खात्याच्या माध्यमातून खातेधारकांना रुपे डेबिट कार्डही उपलब्ध करून दिले जाते.
जनधनच्या सुविधेत वाढ
जनधन योजनेतून खाते उघडलेल्या खातेधारकांना देण्यात येणाऱ्या सुविधेमध्ये वाढ करण्यात आली आहे. जनधन खात्यामध्ये किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही. याशिवाय या योजनेच्या माध्यमातून रुपे (Rupay) कार्डवर देण्यात येणाऱ्या एक लाखाच्या अपघात विमा संरक्षणाच्या रकमेत वाढ करून तो 2 लाख रुपयांचा करण्यात आला आहे. तसेच खातेधारकांना यापुढे 10,000 रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात आली आहे. यापूर्वी 5000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची मर्यादा होती. यामध्ये 2000 रुपयांपर्यतचा ओव्हरड्राफ्ट विनाशर्त मंजुर होणार आहे. तसेच ओव्हरड्राफ्टसाठी वयाची पात्रता 65 वर्षापर्यंत वाढवम्यात आली आहे. तसेच या खातेधारकांना पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनाचा लाभ दिला जाणार आहे. तसेच खातेधारकांना कर्ज पुरवठा करणे विमा आणि पेशन्स योजनेचाही लाभ घेता येणार आहे.
जन खात्याचा आढावा-
या योजनेतून खाते उघडणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 50 कोटी खातेदारांपैकी 56 टक्के जनधन खाती ही महिलांची आहेत.तसेच यामध्ये 67 टक्के खाती ग्रामीण, निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत. तसेच जनधन खात्यातील ठेवींच्या रकमेचा आकडा हा 2.03 लाख कोटी रुपयांच्या वर आहे. तर 5.5 कोटींहून जास्त खात्यांना DBT अंतर्गत लाभ मिळत आहेत.