PPF Scheme Interest Rate: अर्थ मंत्रालय लघु बचत योजना आणि पोस्ट ऑफिस योजनांचे दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन (Review) करून व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेते. अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी व्याजदरात वाढ केली आणि लहान बचत योजनांच्या 12 बचत योजनांपैकी 10 बचत योजनांचे व्याजदर वाढवले. परंतु, पीपीएफचे व्याजदर बदलले नाहीत. सध्या पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के आहे.
आढावा बैठकीत होणार निर्णय
वित्त मंत्रालयाने गेल्या दोन तिमाहीत गुंतवणूकदारांसाठी सर्वात आकर्षक असलेल्या PPF बचत योजनेवरील व्याजदरात वाढ केलेली नाही. चालू जून तिमाहीसाठी व्याजदरात कोणतीही वाढ झालेली नाही. आता जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी अर्थ मंत्रालयाची ३० जून रोजी आढावा बैठक होणार आहे, ज्यामध्ये व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्थ मंत्रालय PPF व्याजदर 8 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत व्याजदर 7.1 टक्के
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) गुंतवणूक योजना ही उच्च व्याज देणारी सर्वात लोकप्रिय सरकारी योजना आहे. 15 वर्षांच्या गुंतवणुकीच्या मर्यादेसह या योजनेत,वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. या रकमेवर सध्या लागू असलेला व्याजदर 7.1 टक्के आहे. अशाप्रकारे, 15 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 रुपये जमा केले जातात,ज्यावर वार्षिक व्याज दर 10,650 रुपये दिला जातो.
कर सवलत देणारी योजना
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना ही एक दीर्घकालीन गुंतवणूकीची योजना आहे; जी आकर्षक व्याज दर आणि गुंतवणुकीच्या रकमेवर चांगला परतावा देते. या योजने अंतर्गत मिळालेले व्याज (Interest) आणि मिळकत (Returns) आयकर कायद्यांतर्गत करपात्र (Taxable) नसते. कलम 80 C अंतर्गत PPF खात्यातील गुंतवणूकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते. या योजनेत केलेली गुंतवणूक निवृत्तीनंतर खूप फायदेशीर ठरू शकते. स्वत:च्या आणि मुलांच्या भविष्यासाठी PPF मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. 15 वर्षांनंतर पीपीएफमधून मिळणारी रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी मोठा आर्थिक आधार ठरू शकते.