Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Pixel Tablet : लॉन्चिंगपूर्वीच लीक झाला गुगलचा पिक्सेल टॅबलेट, पाहा फीचर्स आणि किंमत...

Google Pixel Tablet : लॉन्चिंगपूर्वीच लीक झाला गुगलचा पिक्सेल टॅबलेट, पाहा फीचर्स आणि किंमत...

Google Pixel Tablet : गुगलचा आगामी पिक्सेल टॅबलेट हा लॉन्चिंगच्या आधीच लीक झालाय. अ‍ॅमेझॉनवर तो लीक झालाय. सध्या गुगल आपला I/O प्रोग्राम आयोजित करण्याच्या कामात व्यस्त आहे. यूझर्सदेखील या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

गुगल आपल्या I/O या इव्हेंटच्या माध्यमातून आपले विविध प्रॉडक्ट्स सादर करणार आहे. यात गुगल पिक्सेल 7A (Google Pixel 7a), गुगल पिक्सेल फोल्ड (Google Pixel Fold), गुगल पिक्सेल बड्स A सिरीज (स्काय ब्ल्यू) (Google Pixel Buds A-series - Sky Blue) आणि पिक्सेल टॅबलेट (Pixel Tablet) अशी विविध उत्पादनं सादर करण्याची शक्यता आहे. येत्या 10 मेला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. मात्र यातलं एक प्रॉडक्ट गुगल पिक्सेल टॅबलेट अ‍ॅमेझॉनवर लीक झालंय. त्या अनुषंगानं जाणून घेऊ या टॅबलेटचे फीचर्स काय, किंमत कशी असेल, याविषयी...

फीचर्स, स्पेसिफिकेशन सर्वांसमोर 

गुगलचा पिक्सेल टॅबलेट चुकून अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला आणि त्याचे फीचर्स, किंमत लीक झाली. टॅबलेटचं डिझाइन यातून लक्षात आलं. चुकून अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाल्याचं लक्षात आल्यानंतर ते काढून टाकण्यात आलं. मात्र तेवढ्या वेळेत याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन सर्वांसमोर आले. माय स्मार्ट प्राइज (Mysmartprice) या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, गुगल पिक्सेल टॅबलेट हा अ‍ॅमेझॉन जपानवर (Amazon Japan) लिस्ट झाला होता. पोर्सिलेन आणि ऑलिव्ह ग्रीन या दोन रंगांमध्ये तो दिसून आला. पोर्सिलेन रंग व्हेरिएंट व्हाइट बेझेलसह दिसून आला. तर इतर रंगीत टॅबलेटमध्ये ब्लॅक बेझल्स दिसण्याची शक्यता आहे. स्पीकर डॉकदेखील यात दिसून आला होता. त्यावर चार्जिंग पोर्ट देण्यात आला होता.

काय फीचर्स?

  • 10.9 इंच एलसीडी डिस्प्ले (LCD display) 
  • 2560*1600 पिक्सेल रिझोल्यूशन (Pixel resolution) 
  • 500 nits pick brightness
  • अ‍ॅस्पेक्ट रेशो 16:10
  • USI 2.0 स्टाइलस सपोर्ट
  • Google Tensor G2 प्रोसेसर
  • 8 GB रॅम 128 GB-256 GB स्टोरेज
  • Android 13 व्हर्जन
  • कॅमेरा सेटअप

गुगलचे प्रॉडक्ट आवडणाऱ्यांना फोटो क्वालिटीदेखील महत्त्वाची वाटते. त्यानुसार फोटोग्राफीसाठी 8MP बॅक कॅमेरा, सेल्फीसाठी 8MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. याशिवाय USB 3.1 Gen 1 Type-C पोर्ट, Wifi 6E, Bluetooth 5.2 आणि अल्ट्रावाइड बँड यासारखे काही फीचर्स मिळू शकतात. यात क्वाड स्पीकर सेटअप मिळणार आहे. तसंच 12 तास चालणारी 27W बॅटरी मिळणार आहे.

किंमत काय असेल?

अ‍ॅमेझॉन जपानवर गुगल पिक्सेल टॅबलेट लीक झाला होता. त्यामुळे जपानमधली किंमत यावर दिसून आली. या टॅबलेटची किंमत 80,000 येन दाखवण्यात आली होती. भारतीय रुपयात विचार केल्यास सुमारे 48,500 रुपये इतकी किंमत ठरवली जाऊ शकते. अर्थातच कंपनीनं अद्याप अधिकृतपणे या फीचर्स आणि किंमतीबद्दल काहीच जाहीर केलेलं नाही. त्यामुळे या डिव्हाइसची नेमकी किंमत काय, हे लॉन्चिंगच्याच वेळी समजणार आहे.

काय आहे I/O इव्हेंट?

गुगल आपला आयओ इव्हेंट आयोजित करत असतं. माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया याठिकाणी कंपनीचा का प्रोग्राम असतो. I/O म्हणजे इनपुट/आउटपुट तसेच इनोव्हेशन इन द ओपन हे प्रोग्रामचं घोषवाक्य आहे. इव्हेंट हा गुगल डेव्हलपर डे (Google Developer Day) यासारखंच असतं. कोविडमुळे मध्यंतरी हे इव्हेंट रद्द करण्यात आले होते. तर 2021ला Google I/O ऑनलाइन करण्यात आलं.