गुगलचा पिक्सेल (Google Pixel) हा स्मार्टफोन अनेकांसाठी आकर्षणाचा विषय असतो. त्यामुळे गुगल कोणताही नवा स्मार्टफोन आणण्याच्या आधीच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते. हीच उत्सुकता नव्या पिक्सेल फोल्डबाबतही दिसून येतेय. या फोल्डेबल डिव्हाइचं वैशिष्ट्य काय, यात कोणते नवे फिचर्स असतील, याचं डिझाइन नेमकं कसं असेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे किंमत किती असेल असे विविध प्रश्न स्मार्टफोनप्रेमींना पडले. त्याची उत्तरं गुगलनं दिली आहे. एक छोटा टीझर आणि लॉन्चिंगची तारीख गुगलनं जाहीर केलीय.
Table of contents [Show]
बाजारपेठेत उत्सुकता
गुगल आपला पिक्सेल फोल्ड हा नवाकोरा स्मार्टफोन 10 मेला लॉन्च करणार आहे. फोल्डेबल प्रकारातला असल्यानं याविषयी बाजारपेठेतही कमालीची उत्सुकता आहे. गुगलनं मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर (Twitter) याविषयीची माहिती दिलीय. एक टीझर व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यातून पिक्सेल फोल्ड स्मार्टफोनच्या काही फीचर्सवर प्रकाश टाकण्यात आलाय. तर या महिन्याच्या शेवटी गुगल आय/ओ (Google I/O) या टेक जायंटच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये डिव्हाइस खुला केला जाणार आहे.
✨May The Fold Be With You✨https://t.co/g6NUd1DcOJ#GoogleIO #PixelFold
— Made by Google (@madebygoogle) May 4, 2023
May 10 pic.twitter.com/K8Gk21nmo8
टीझरमधून दिसतंय आधुनिक तंत्रज्ञान
गुगलनं ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्मार्टफोनचा पूर्ण अपिअरन्स दिसतोय. पिक्सेल फोल्डचं एकूणच डिझाइन, लूक यातून दिसतोय. इतर मोबाइलप्रमाणं बॅकसाइडला कॅमेरा फंक्शन आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओतून आधुनिक तंत्रज्ञान असलेली फोल्डेबल डिस्प्ले टेक्नॉलॉजी दिसून येतेय.
एक्सपेक्टेड फीचर्स
रिपोर्ट्सनुसार, गुगल पिक्सेल फोल्ड (Pixel Fold) हा 5.8-इंचाचा स्मार्टफोन असणार आहे. 7.6 इंचाच्या टॅबलेटमध्ये फोल्ड होण्याची सुविधा असणार आहे. यात गुगल टेन्सर जी 2 (Google Tensor G2) प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय.
एक्सपेक्टेड प्राइज
गुगलच्या या स्मार्टफोनची किंमत सुमारे 1,700 डॉलर असण्याची शक्यता आहे. सॅमसंगचा झेड फोल्ड (Z Fold 4) 1,799 डॉलर या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता.
कॅमेरा
या स्मार्टफोनमध्ये 9.5MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि आतल्या डिस्प्लेवर 8MP सेल्फी कॅमेरा असू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा IPX8 वॉटर रेझिस्टन्स आणि USB टाइप-सी 3.2 gen 2 या फीचरसह उपलब्ध होऊ शकतो.
कलर
पिक्सेल फोल्ड हा नवा डिव्हाइस दोन रंगांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पोर्सिलेन आणि ऑब्सिडियन (काळा).
आणखी एक स्मार्टफोन
टेक जायंट पिक्सेल टॅब्लेटसह या वर्षी मे महिन्यात 1,799च्या किंमतीत आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. याचदरम्यान गुगलनं आपल्या बहुप्रतिक्षित स्मार्टफोन गुगल पिक्सेल 7एची (Google Pixel 7A) लॉन्चिंग तारीखही निश्चित केल्याचं समजतंय. या 'बजेट' स्मार्टफोनचं अनावरण 11 मेला होणार आहे.
सर्वात जास्त रिफ्रेश रेट?
गुगल पिक्सेल 7एच्या (Google Pixel 7A) डिस्प्लेमध्ये 90Hzचा रिफ्रेश रेट असणं अपेक्षित आहे. डिव्हाइस 90Hz 1080p डिस्प्ले ऑफर करण्याची शक्यता आहे, असं अॅन्ड्रॉइड ऑथोरिटीच्या (Android authority) रिपोर्टमध्ये म्हटलंय. ए सिरीज स्मार्टफोनवर हा रिफ्रेश रेट आतापर्यंतचा सर्वात जास्त असणार आहे. यासंबंधीच्या विविध रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आलीय.