Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Pay UPI Lite : आता UPI पिन न टाकता फक्त एका क्लिकवर होणार पेमेंट

UPI LITE

Image Source : /www.mindgate.solutions

गुगल पे ने आता UPI Lite ची सुविधा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे गुगल पे च्या वापरकर्त्यांना आता पिन न टाकता किरकोळ मूल्यांचे व्यवहार एका क्लिकवर करता येणार आहेत. UPI Lite वापरकर्त्यांना 200 रूपयांपर्यंतचे व्यवहार सहजपणे करता येतात.

Google Pay वर आता ग्राहकांना पिन न टाकता पेमेंट करता येणार आहे. कारण गुगल-पे ने आता UPI Lite ची सुविधा कार्यान्वित केली आहे. या सुविधेमुळे गुगल-पे च्या वापरकर्त्यांना आता किरकोळ मूल्यांचे व्यवहार एका क्लिकवर करता येणार आहेत. UPI Lite ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे डिझाइन करण्यात आलेली एक डिजिटल पेमेंट सेवा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2022 मध्ये याची सुरुवात केली आहे. आता गुगल-पे कडून या फिचरचा वापर सुरू करण्यात आला आहे.

Google Pay कंपनीचे उद्दिष्ट डिजिटल पेमेंट सोपे, जलद आणि विश्वासार्ह बनवण्याचे आहे. त्यासाठीच गुगल-पे कडून UPI Lite ची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून आता ग्राहकांना 200 रुपयांपर्यंतचे व्यवहार सहजपणे करता येतात. लाइट खात्यात दिवसातून दोनवेळा 2,000 रुपयांपर्यंत पैसे भरता येतात. त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंतचे पिन कोड न टाकता पेमेंट करू शकता.  गुगल पे लाईट हे तुमच्या बँक खात्याशी जोडले जाईल.

 UPI LITE  अ‍ॅक्टिव्ह कसे करायचे
Gpay lite फिचर वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही केवायसी (KYC) पडताळणीची गरज नाही. UPI Lite अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी पुढील काही स्टेप तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.

  • तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर Google Pay अ‍ॅप उघडा.
  • तुमच्या प्रोफाइलमध्ये जाऊन'UPI LITE' पर्याय शोधा
  • SETUP PAYMENT METHODS मध्ये तुम्हाला UPI LITE पर्याय दिसेल
  • UPI LITE या वर क्लिक करून दिलेली माहिती वाचा 
  • त्यानंतर UPI LITE सक्रिय करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
  • UPI LITE सक्रिय झाल्यानंतर तुम्हाला खात्यात पैसे जमा करावे लागतील
  • तुम्ही 2000 रुपये जमा करून तुम्ही UPI LITE ची सेवा वापरायला सुरुवात करू शकता.