गुगल कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन 'बार्ड' चॅटबॉट (Google Bard Chatboat) तयार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा चॅटबॉट तुम्हाला पडलेल्या किचकट प्रश्नांची उत्तरेही सहज देऊ शकणार आहे. मायक्रोसॉफ्टने Open AI या कंपनीमध्ये गुंतवणूक केली असून या कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या Chat GPT हा बॉट प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्यामुळे आता Bard चॅटबॉटची टक्कर Chat GPT शी असणार आहे. गुगलने लाँच केलेला बॉट सर्च इंजिनशी जोडण्यात येणार असून त्याद्वारे तुम्ही प्रश्न विचारू शकता.
अवघड प्रश्नांची उत्तरे देणार चुटकीसरशी (Bard Chatbot will answer complex queries)
वापरकर्त्याने विचारलेल्या अवघड प्रश्नांची उत्तरेही या चॅटबॉटला देता येणार आहेत. गिटार शिकणे सोपं आहे की अवघड? असा प्रश्न जरी तुम्ही चॅटबॉटला विचारला तरी त्याकडून तुम्हाला सोप्या शब्दात उत्तर मिळेल. Google Bard साठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान गुगल सर्च इंजिनसाठीही वापरण्यात येणार आहे. गुगल सर्च इंजिन करोडो नागरिकांकडून दरदिवशी वापरण्यात येते. त्याचा फायदा गुगलला प्रश्न विचारण्यासाठी करता येईल. सर्च इंजिनमध्ये माईक बटनवर क्लिक करुन तुम्ही प्रश्न विचारू शकता.
चॅटजीपीटी काय करू शकते? (What can Chat GPT do)
मायक्रोसॉफ्टने Open AI या कंपनीमध्ये 10 बिलियन डॉलर एवढी गुंतवणूक केली आहे. या कंपनीने Chat GPT हा बॉट तयार केला आहे. तुम्ही जर या चॅटबॉटला सांगितले की, पर्यावरण बदल या विषयावर निबंध लिहून दे, तर तुम्हाला लगेच या विषयावर दीर्घ लिहलेला निबंधही मिळू शकतो. तसेच रिझ्यूमे, जॉब अॅप्लिकेशन, लेख, एखाद्या विषयावरची सविस्तर माहिती किंवा बॉसला मेलही हा बॉट लिहू शकतो. अशा असंख्य गोष्टींमुळे हा बॉट अत्यंत फेमस झाला आहे.
चॅटबॉट म्हणजे काय? (What is ChatBoat)
चॅटबॉट ही एक सॉफ्टवेअर प्रणाली असून तुमच्याशी दुसऱ्या व्यक्तीप्रमाणे संवाद साधू शकते. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. चॅटबॉट तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, न्युरल नेटवर्क, डीप लर्निंग अशा टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, अॅपल अशा कंपन्यांचे स्वत:चे चॅटबॉट्स आहेत. या चॅटबॉट्सचा वापर विविध व्यवसायांकडूनही केला जातो. बँकिंग, विमा, इ-कॉमर्स सह अनेक क्षेत्रात चॅटबॉट ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी वापरण्यात येतो. बॉटच्या वापरामुळे कंपन्यांच्या खर्चात कपात होते.
गुगल बार्ड इंटरनेटवरील अपडेटेड माहिती देणार (Bard will give updated information)
बार्ड चॅटबॉटच्या लाँचेवेळी सुंदर पिचाई यांनी म्हटले की, बार्डद्वारे तुम्हाला अपडेटेड माहिती मिळेल. अवघड माहिती लहान मुलालाही सोप्या पद्धतीने समजून सांगण्याची क्षमता या बॉटमध्ये आहे. या चॅटबॉटमध्ये नाविन्यता असून सखोल माहिती भरलेली आहे. इंटरनेटवर जमा झालेली ताजी माहितीही तुमच्यापर्यंत बॉटद्वारे पोहचवता येईल.