Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मोबाईल प्रेमींसाठी खुशखबर; OnePlus 9 5G फोन झाला आणखी स्वस्त!

oneplus price down sell buy

OnePlus ने कंपनीने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 9 5G च्या किमतीत पुन्हा एकदा मोठी कपात केली आहे. यापूर्वीही कंपनीने या हॅण्डसेटची किंमत 5 हजार रूपयांपर्यंत कमी केली होती.

OnePlus कपंनीची OnePlus 10 ही नवीन सिरीज जुन्या OnePlus 9 5G ची जागा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनप्लस 9 5जी फोनची किंमत कंपनीने पुन्हा एकदा कमी केली आहे. यापूर्वीही कंपनीने वनप्लस 9 ची किंमत 5 हजार रूपयांनी कमी केली होती. वनप्लस कंपनीने 9 सिरीजचा फोन गेल्यावर्षी मार्चमध्ये लॉण्च केला होता.

तुम्ही जर OnePlus स्मार्टफोन्सच्या प्रेमात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. OnePlus कंपनीने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 9 5G च्या किमतीत पुन्हा एकदा कपात केली आहे. OnePlus 9 5G हा स्मार्टफोन 8 आणि 12 जीबी रॅममध्ये उपलब्ध आहे. 8 जीबी रॅमच्या फोनची किंमत 44,999 रूपये तर 12 जीबी रॅमच्या फोनची किंमत 49,999 रूपये होती. कंपनीने या फोनची किंमत तब्बल 7 हजार रूपयांनी कमी केली आहे. नवीन किमतीनुसार 8 जीब रॅमचा OnePlus 9 5G स्मार्टफोन 37,999 रूपयांना तर 12 जीबी रॅमचा फोन 42,999 रूपयांना मिळणार आहे. हा स्मार्टफोन आर्क्टिक स्काय (Arctic Sky), विंटर मिस्ट (Winter Mist) आणि ब्लॅक (Black) अशा 3 रंगामध्ये उपलब्ध आहे.

हा फोन जेव्हा लॉण्च करण्यात आला होता तेव्हा 8 आणि 12 जीबी रॅमच्या फोनची किंमत अनुक्रमे 59,999 रूपये आणि 64,999 रूपये एवढी होती.

OnePlus 9 5G ची खास फिचर्स

  • OnePlus 9 5G स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.55 इंच फूल एचडी + फ्लुइड AMOLED आहे.
  • डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 एचझेड आहे.
  • याचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लासने संरक्षित आहे.
  • फोनचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे.
  • यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आहे.
  • हे स्मार्टफोन 8 आणि 12 जीबी रॅममध्ये उपलब्ध आहेत.
  • OnePlus 9 5G मध्ये 128 जीबी आणि 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.
  • यात मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवण्याची सुविधा आहे.
  • याची बॅटरी 4500 mAh इतकी असून फोनचे वजन 183 ग्रॅम आहे.


स्पेशल कॅमेरा फिचर्स

  • फोटोग्राफीसाठी 48 एमपीचा प्रायमरी कॅमेरा, 50 एमपी अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा आणि मागील बाजूस 2 एमपी मोनोक्रोम कॅमेरा आहे.
  • सेल्फी फोटोग्राफीसाठी फोनच्या फ्रंटसाईडला 16 एमपी कॅमेरा आहे.
  • यात डॉल्बी एटमॉस सपोर्टसह ड्युअल-स्टिरिओ स्पीकर आहेत.

    image source - https://bit.ly/3OhFeJ6