Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio Mobile Recharge Plan: जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, वार्षिक मोबाईल रिचार्जवर होणार 683 रुपयांची बचत!

Jio Annual Recharge Plan

Jio Mobile Recharge Plan: तुम्हीही जिओचे वापरकर्ते असाल, तर जिओचा वार्षिक मोबाईल रिचार्ज खरेदी केल्यावर 683 रुपयांची बचत होणार आहे. तसेच अनलिमिटेड कॉल, मेसेज, इंटरनेट डेटा आणि जिओच्या अ‍ॅपचे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

सध्या सर्वच मोबाईल कंपनीनाचे रिचार्ज प्लॅन अतिशय महाग झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील असे रिचार्ज प्लॅन सादर करणे अतिशय गरजेचे आहे. हाच विचार करून जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा (Unlimited Calling), इंटरनेट डेटा (Internet Data), एसएमएसची सुविधा (SMS) आणि ठराविक  अ‍ॅपचे फ्री सबस्क्रिप्शन ( Free App Subscription) देण्यात येणार आहे. हे सर्व जिओच्या वार्षिक प्लॅनमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा प्लॅन खरेदी केल्यावर ग्राहकांची 683 रुपयांची बचत होणार आहे. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

जिओच्या वार्षिक प्लॅनबद्दल जाणून घ्या

जिओचा वार्षिक मोबाईल रिचार्ज प्लॅन हा 2545 रुपयांचा आहे. यामध्ये जिओच्या युजर्सना दररोज 1.5 GB इंटरनेट डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा डेटा 5G स्वरूपातील असून डेली लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64 Kbps होणार आहे. ग्राहकांना वार्षिक 504GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. त्याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा वर्षभर मिळणार आहे. तसेच 100 एसएमएस ग्राहकांना दिवसाला करता येणार आहेत.

'या' अ‍ॅपचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल

जिओच्या वार्षिक प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ टीव्ही (Jio TV), जिओ सिनेमा (Jio Cinema), जिओ सिक्युरिटी (Jio Security), जिओ क्लाउडचे (Jio Cloud) फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

683 रुपयांची बचत कशी होईल?

रिलायन्स जिओच्या 1.5GB मासिक रिचार्ज प्लॅनची किंमत 269 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 42 GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये जिओ सावनचे (Jio Saavan) फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे. जर ग्राहकांनी 1.5 जीबीचे वार्षिक 12 रिचार्ज केले, तर 3228 रुपये होणार आहेत. मात्र ग्राहकांनी वार्षिक 2545 रुपयांचा प्लॅन खरेदी केला, तर 683 रुपयांची बचत होईल. त्याशिवाय इतर सुविधा देखील मिळणार आहेत.

इतर कंपन्यांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनची किंमत जाणून घ्या

देशातील नामांकित एअरटेल (Airtel) कंपनीच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनची किंमत 2999 रुपये आहे. तर वोडाफोन आयडिया (VI) कंपनीने वेगवेगळ्या सुविधा देणारे  दोन वार्षिक रिचार्ज प्लॅन काढले आहेत. ज्याची किंमत 3099 आणि 2899 रुपये आहे.

Source: navbharattimes.indiatimes.com