सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार आणि पर्याय उपलब्ध आहेत. पण प्रत्येक जण आपापल्यापरीने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतो. गुंतवणुकीच्या विविध योजनांमध्ये आयपीओ (Initial Public Offer-IPO) हा एक प्रकार आहे. एखादी नवीन कंपनी किंवा असूचीबद्ध कंपनी जेव्हा प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज आणि शेअर्सच्या माध्यमातून निधी उभारते. तेव्हा त्याला प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजेच आयपीओ म्हटले जाते. तर आज आपण सप्टेंबर महिन्यात कोणकोणते आयपीओ येणार आहेत. त्यांची प्रति शेअर्सची किंमत किती? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे आयपीओ गुंतवणुकीसाठी कोणत्या तारखेला आणि किती दिवस खुले असणार आहेत, हे पाहणार आहोत.
Table of contents [Show]
आयपीओ म्हणजे काय?
जेव्हा एखादी नवीन कंपनी किंवा असूचीबद्ध कंपनी निधी उभारण्यासाठी आपल्या सिक्युरिटीज किंवा शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देते. त्या प्रक्रियेला आयपीओ म्हटले जाते. आयपीओ ही कंपन्यांसाठी निधी उभारण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे कंपनी आपले शेअर्स गुंतवणूकदारांना विकून त्यातून निधी गोळा करते.
आज आपण सप्टेंबर महिन्यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. त्यांच्या तारखा काय आहेत. तसेच ते किती शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण आयपीओमधील दोन बेसिक प्रकार समजून घेऊयात. एक म्हणजे नियमित आयपीओ आणि दुसरा प्रकार म्हणजे एसएमई आयपीओ (SME IPO). एसएमई आयपीओ म्हणजे स्मॉल अॅण्ड मिडिअम एन्टरप्रायझेस आयपीओ. 100 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्या कंपन्या बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ आणतात. या कंपन्यांच्या आयपीओला SME IPO म्हटले जाते.
पुढील 15 दिवसांत येणारे आयपीओ
साई सिल्क (Sai Silks)
साई सिल्क कंपनीचा आयपीओ 20 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओच्या प्रति शेअर्सची किंमत 210 ते 222 रुपये या दरम्यान असणार आहे. कंपनीने एकूण 1200 कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. याच्या एक लॉटमध्ये 67 शेअर्स असणार आहेत. गुंतवणूकदारांना 22 सप्टेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
सिग्नेचर ग्लोबल (Signature Global)
रिअल इस्टेट मार्केटमधील सिग्नेचर ग्लोबल इंडिया(signature global india limited) कंपनी शेअर बाजारात आपला IPO आणणार आहे. पुढील आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी कंपनी आपला आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. आयपीओच्या माध्यमातून सिग्नेचर ग्लोबल कंपनी 730 कोटी रुपये उभे करणार आहे. कंपनीने प्रति शेअर प्राइस बँड 366 रुपये ते 385 रुपये निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना 22 सप्टेंबर पर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.
जेएसडब्ल्यू इन्फ्रा (JSW Infra)
जेएसडब्ल्यू ग्रुपमधील JSW Infra या कंपनीचा आयपीओ 25 सप्टेंबरपासून ओपन होणार असून तो 27 सप्टेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 2800 कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. कंपनीने अद्याप प्रति शेअर्सची किंमत आणि लॉट साईज जाहीर केलेले नाही.
मधुसूदन एसएमई आयपीओ (Madhusudan SME IPO)
मधुसूदन कंपनीचा आयपीओ 18 सप्टेंबरपासून ओपन होणार आहे. कंपनीने याच्या प्रति शेअर्सची किंमत 66 ते 70 रुपये निश्चित केली. याच्या एका लॉटमध्ये 2000 शेअर्स असणार आहेत. मधुसूदन कंपनीने 23 कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. गुंतवणूकदारांना यामध्ये 21 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.
मास्टर कॉम्पो (Master Compo)
मास्टर कॉम्पो कंपनीचा आयपीओसु्द्धा 18 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहे. कंपनीने याच्या एका शेअर्सची किंमत 140 रुपये निश्चित केली आहे. एकूण 15.23 कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असणार असून, याच्या एका लॉटमध्ये 1000 शेअर्स असणार आहेत. गुंतवणूकदारांना 21 सप्टेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.