रिअल इस्टेट मार्केटमधील सिग्नेचर ग्लोबल इंडिया(signature global india limited) कंपनी शेअर बाजारात आपला IPO आणणार आहे. पुढील आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी कंपनी आपला आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. गुंतवणूक करण्यासाठी जाणून घ्या आयपीओचा पूर्ण तपशील.
730 कोटी रुपये उभे करणार
जवळपास एक दशकापासून ग्राहकांनी परवडणारी घरे उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणून सिग्नेचर ग्लोबलची ओळख निर्माण झाली आहे. कंपनी येत्या 20 स्पप्टेंबर रोजी आपला आयपीओ शेअरबाजारात दाखल करणार आहे. आयपीओच्या माध्यमातून सिग्नेचर ग्लोबल कंपनी 730 कोटी रुपये उभे करणार आहे. कंपनीने प्रति शेअर प्राइस बँड 366 रुपये ते 385 रुपये निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना 22 सप्टेंबर पर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.
432 कोटी रुपयांची कर्ज फेड
सिग्नेचर ग्लोबल कंपनी आयपीओच्या माध्यमातून 730 कोटी रुपये उभे करणार आहे. यातून कंपनी 432 कोटी रुपयांचा वापर हा कर्जाची परत फेड करण्यासाठी करणार आहे. तर उर्वरित रकमेतून कंपनी आपल्या व्यवसाय वाढीसाठी जमीन खरेदी करणे यासह इतर धोरणे राबवण्यावर भर देणार आहे.
कंपनीकडून 603 कोटी रुपयांचे नवीन शेअर गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर इंटरनॅशन फायनान्स कंपनीकडून तर जवळपास 127 कोटींचा ऑफर फॉर सेल असणार आहेत. आयपीओमधील 75 % भाग हा क्वॉलिफाईड इस्टिट्युशनल खरेदीदारांसाठी राखीव असतील. त्यामध्ये 60 % हे संस्थात्मक गुतंवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. संस्थात्मक गुतंवणूकदारांना 18 सप्टेंबर पासून गुतंवणूक करता येणार आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी 10% शेअर्स उपलब्ध आहेत.