कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत आज सोमवारी 20 फेब्रुवारी 2023 रोजी वाढ झाली. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 90 रुपयांनी वधारला तर चांदी 260 रुपयांनी वाढ झाली. ( Gold and Silver Price Rise today 20th Feb 2023)
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) दुपारी 3 वाजता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56310 रुपये इतका आहे. त्यात 53 रुपयांची वाढ झाली. इंट्रा डेमध्ये सोन्याचा भाव 56345 रुपयांपर्यंत वाढला होता. शुक्रवारच्या सत्रात सोने 55827 रुपयांपर्यंत खाली घसरले होते. मागील एक महिन्याचा हा नीचांकी स्तर होता. गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते.
एमसीएक्सवर आज चांदीचा भाव सावरला. एक किलो चांदीचा भाव 65892 रुपये इतका वाढला आहे. त्यात शुक्रवारच्या तुलनेत 260 रुपयांची वाढ झाली. चांदीमध्ये शुक्रवारी 1150 रुपयांची घसरण झाली होती.इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज सोमवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 56590 रुपये इतका आहे. 22 कॅरेटचा दर 55230 रुपये असून 18 कॅरेट सोन्याचा भाव 45840 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव 65712 रुपये इतका आहे.
Goodreturns या वेबपोर्टलनुसार आज सोमवारी मुंबई सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52100 रुपये इतका आहे. त्यात शुक्रवारच्या तुलनेत 100 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेटचा भाव 56830 रुपये इतका आहे. त्यात 120 रुपयांची घसरण झाली. पुण्यात आज सोने 120 रुपयांनी स्वस्त झाले. पुण्यात 22 कॅरेटचा भाव 52100 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 56830 रुपये इतका आहे.
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 52100 रुपये इतका असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 56830 रुपये इतका आहे. चेन्नईत आज सोने 110 रुपयांनी स्वस्त झाले. 22 कॅरेट सोन्याचा भाव 52800 रुपये इतका आहे.24 कॅरेट सोन्याचा प्रती 10 ग्रॅमचा दर 57600 रुपये इतका असून त्यात शुक्रवारच्या तुलनेत 110 रुपयांची घसरण झाली. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52100 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 56830 रुपये इतका असून सोनं 120 रुपयांनी स्वस्त झाले.
अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने प्रमुख व्याजदरात 0.50% वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेतील महागाई अद्याप आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे अमेरिकेत सेंट्रल बँकेकडून व्याजदर वाढ केली जाण्याची शक्यता आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर भू राजकीय संघर्ष आणि मंदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतीवर आणखी काहीकाळ दबाव राहील, असा अंदाज कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. नजीकच्या काळात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 55980 ते 55810 या दरम्यान राहील, असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने 1848 डॉलर ते 1855 डॉलरच्या दरम्यान राहील, असा अंदाज आहे.
जागतिक पातळीवर सोन्यातील घसरण सुरुच
जागतिक कमॉडिटी बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव 0.2% ने घसरला. सोने दर 1837.59 डॉलर प्रती औंस इतका झाला आहे. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव 0.1% इतका घसरला असून तो 1847.60 डॉलर इतका आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव 1830 डॉलरपर्यंत खाली आला होता. चांदीचा भाव प्रती औंस 21.15 डॉलर इतका खाली आला आहे. सोन्यामधील घसरणीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे.