Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Rate Today : सोने 57,000 रुपयांपार इतिहासात प्रथमच झाली इतकी वाढ

Gold Rate Today : सोने 57,000 रुपयांपार इतिहासात प्रथमच झाली इतकी वाढ

Gold Rates Today : मंगळवारी सोन्याच्या किमतीने आपली तेजी कायम ठेवत 57,000 प्रती दहा ग्रॅम उच्चांक गाठला.फेब्रुवारी 2023 मध्येही सोन्यात दरवाढ बघायला मिळणार आहे. सकाळी 9:30 वाजता मालती कामोडिटी एक्सचेंजवर 0.40 सोन्याचा भाव 57,044 इतका झाला. त्याचवेळी एमसीएक्सवर चांदीचा भाव जवळपास 0.68 % वाढून 68,343 इतका झाला.

मंगळवारी सोन्याच्या किमतीने आपली तेजी कायम ठेवत 57,000 प्रती दहा ग्रॅम उच्चांक गाठला.फेब्रुवारी 2023 मध्येही सोन्यात दरवाढ बघायला मिळणार आहे. सकाळी 9:30 वाजता मल्टी कामोडिटी एक्सचेंजवर ( Multi -  Commodity Exchange) 0.40 सोन्याचा भाव 57,044 इतका झाला. त्याचवेळी एमसीएक्सवर (MCX) चांदीचा भाव जवळपास 0.68 % वाढून 68,343 इतका झाला. 
गेल्या आठवड्यातील सोन्यातील दरवाढीचे कारण कमकुवत अमेरिकन डॉलर व घटते उत्पन्न आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. या महिन्याच्या अखेरीस फेडरल रिझर्व्ह बँकेची  (Federal Reserve Bank) बैठक होईल व्याजदर वाढीवर या बैठकीत काय निर्णय होते याकडे गुंतवणूक दारांचे लक्ष लागले आहे.

शेअरखान येथील मूलभूत चलन विश्लेषक एव्हीपी प्रवीण सिंग यांच्या मते यूएस डेटा रिलीज होण्यापूर्वी मौल्यवान गोष्टींवर परिणाम होऊ शकतो.कारण गेल्या काही दिवसात डॉलरवर दबाव निर्माण झाला आहे. यामुळे बाजारात मौल्यवान वस्तूंच्या किमतीत चढ-उतार होतांना आपल्याला दिसतोय.

भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी करणे अपेक्षित

भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी करणे अपेक्षित आहे. सोने बाजार विश्लेषक एडवर्ड मोया ( Edward Moya) म्हणाले "सोने या किमतीवर स्थिर होऊ शकते कारण मार्केट या आठवड्याच्या शेवटी प्रमुख यूएस जिडीपी किंवा कोर PCE डेटा मिळेपर्यंत रॅली करणार नाही.भारताने आयात शुल्क कमी केल्यास जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या सोने बाजारपेठेत हंगामाच्या काळात दरवाढ कमी झाल्यास ग्राहकांची संख्या वाढतांना आपल्याला दिसेल.