• 28 Nov, 2022 16:30

Gold Price Today: दिवाळीनंतर पहिल्यांदाच सोने दरात तेजी, सोने महागले

Gold Price Today , Gold Price

Gold Price Rise Today : मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या फ्युचर्सचा दर 170 रुपयांनी वाढून 50672 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 66 रुपयांनी वाढून 58912 रुपये प्रतिकिलो झाला. सत्राच्या सुरुवातीला सोने 50502 रुपये आणि चांदी 58846 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होऊनही त्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. आज बुधवारी 2 नोव्हेंबर 2022 रोजी सोन्याचा भाव वाढला.  दिवाळीनंतर पहिल्यांदाच सोने दरात तेजी दिसून आली. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत फार तफावत न दिसल्याने सोन्याच्या खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळी सराफा बाजारात सोने आणि चांदीमध्ये संमिश्र कल दिसून आला. त्याचवेळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोने आणि चांदी महागले. 

गोल्ड फ्युचरमध्ये १७० रुपयांची तेजी (Gold Future) बुधवारी दुपारी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या फ्युचर्सचा दर 170 रुपयांनी वाढून 50672 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 66 रुपयांनी वाढून 58912 रुपये प्रतिकिलो झाला. सत्राच्या सुरुवातीला सोने 50502 रुपये आणि चांदी 58846 रुपये प्रति किलोवर बंद झाली.


बुधवारी इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 50,690 रुपये प्रती 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. त्याचवेळी चांदीचा भावही 500 रुपयांनी घसरून 58532 रुपये प्रतिकिलो झाला. 23 कॅरेट सोन्याचा दर 50487 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा दर 46432 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 38018 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.