मागील आठवडाभरापासून तेजीत असलेल्या सोन्याच्या किंमतींना आज नफावसुलीचा फटका बसला. आज बुधवारी 8 फेब्रुवारी 2023 रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमतीत 130 रुपयांची घसरण झाली. सोन्याचा भाव 57122 रुपयांपर्यंत खाली आला होता. चांदीमध्ये मात्र तेजी कायम आहे. (Gold Price Fall today while Silver rally continue)
सकाळच्या सत्रातील सोन्याच्या किंमतीवरील दबाव कमी झाला आहे. दुपारी 2 वाजता एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57332 रुपये इतका आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत 75 रुपयांची वाढ झाली. इंट्रा डेमध्ये सोन्याचा भाव 57384 रुपये इतका वाढला होता. एक किलो चांदीचा भाव 67772 रुपये इतका आहे. त्यात 243 रुपयांची वाढ झाली.
Goodreturns या वेबपोर्टलनुसार आज बुधवारी मुंबई सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52750 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 57550 रुपये इतका आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत 200 रुपयांची घसरण झाली.
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 52900 रुपये इतका आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 57700 रुपये इतका आहे. चेन्नईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 53830 रुपये इतका आहे. 24 कॅरेट सोन्याचा प्रती 10 ग्रॅमचा दर 58720 रुपये इतका वाढला असून त्यात मंगळवारच्या तुलनेत 100 रुपयांची वाढ झाली. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52750 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 57550 रुपये इतका आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 0.1% ने वाढला असून तो 1876.40 डॉलर प्रती औंस इतका झाला. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव 0.2% ने वाढून 1887.90 डॉलर प्रती औंस इतका वाढला आहे. सलग चौथ्या सत्रात सोन्याचा भाव वधारला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात भारतातील सराफा बाजारात सोन्याचा भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे.