Gold Price Hike News : भारतात महागाई वाढल्याने सोन्याच्या किमतीही सातत्याने वाढत होत आहे. त्यामुळे सोने खरेदीवर महागाईचा दुहेरी फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. सोने ही अशी वस्तू आहे, जी प्रत्येक भारतीय व्यक्ती आणि कुटुंबाला कधी ना कधी खरेदी करावीच लागते. बहुतेक लोक लग्न आणि इतर विशेष प्रसंगी सोने खरेदी करतात. सोने हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे ते गुंतवणुकीसाठी देखील सर्वोत्तम मानले जाते. लग्नात मुलींना भेटवस्तू देण्यासाठी सोन्याची खरेदी केली जाते.परंतु सोन्याच्या किमतीत वर्षानुवर्षे वाढ होत असल्याने नजीकच्या काळात लोकांना लग्नाच्या काळात सोने खरेदी करताना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत आणि खिसा अधिक मोकळा करावा लागणार आहे.
1947 मध्ये सोने 88.62 रुपये तोळा होते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वातंत्र्यानंतर सोन्याच्या किमतीवर नजर टाकली तर त्याची किंमत झपाट्याने वाढली आहे. सन 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी सोन्याचा भाव 88.62 रुपये तोळा इतका होता. मात्र, 1964 मध्ये सात वर्षांनंतर सोन्याचा भाव 65.25 रुपये झाला. म्हणजेच 1964 मध्ये सोन्याच्या किमतीत सुमारे 29 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली होती. त्यानंतर सोन्याच्या दरात एवढी मोठी घसरण कधीच पाहायला मिळाली नव्हती. यानंतर 1970 मध्ये सोने सुमारे 63.25 रुपयांनी महागले आणि 184 रुपयांवर पोहोचले. म्हणजेच सोन्याच्या किमतीत सुमारे तीनपट वाढ नोंदवली गेली, तर 1975 साली सोन्याची किंमत 540 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. पाच वर्षांनंतर 1980 मध्ये ते 1333 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. त्यानुसार सोन्याच्या किमतीत दरवर्षी सरासरी दुप्पट वाढ झाली आहे.
दर पाच वर्षांत सोने दीड ते दोन पटीने महागले
स्वातंत्र्यानंतर सोन्याच्या किमतीतील वाढ थांबण्याचे नाव घेत नाहीये. 1985 मध्ये सोन्याचा भाव 2150 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याचवेळी 1990 मध्ये पाच वर्षांनंतर सोन्याचा भाव 3200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. या पाच वर्षांत त्याची किंमत सुमारे 50 टक्क्यांनी म्हणजे दीडपट वाढली आहे. या दृष्टिकोनातून सोन्याच्या किमतीचा आकडा पाहिला तर त्याच्या किंमतीत दीड ते दोन पट वाढ झाली आहे.
2014 नंतर सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ
भारतात ज्या वेगाने सोन्याच्या किमती वाढत आहेत, त्यावरून येत्या 10 वर्षात सोन्याची किंमत 80 हजारांच्या पुढे जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2014 पासून सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 2014 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 28003 रुपये होती, जी 2023 मध्ये नऊ वर्षांनंतर 58,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. गेल्या नऊ वर्षांत सोन्याच्या दरात सुमारे 30,544 रुपयांची म्हणजेच 100 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
सोन्याचे भाव कधी कमी होतील?
तज्ञांच्या मते, देशातील वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या किमतीत नरमाईचा कल दिसून येत आहे. सध्या महागाई शिगेला पोहोचली असून सोन्याचे भावही वाढत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे भाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये.