भारतीय सराफा बाजारात आज शुक्रवारी सोन्याच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. लेटेस्ट दर बघितले असता 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 52 हजारांवर पोहोचली आहे, तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत 62 हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी 4 वाजता 99 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव 52277 वर पोहोचला असून 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव 52068 वर गेला आहे. त्याचवेळी 916 शुद्धतेचे सोने आज 47886 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 39208 रुपये झाला आहे. त्याचवेळी 585 शुद्धतेचे सोने आज 30582 रुपयांना महागले आहे. याशिवाय 999 शुद्धतेचा एक किलो चांदीचा भाव आज 62200 रुपयांवर आला आहे.
किती रुपयांनी महागले सोने आणि चांदी
999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने आज 763 रुपयांनी महागले आहे आणि 995 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने आज 760 रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने 699 रुपयांनी, 750 शुद्धतेचे सोने 572 रुपयांनी आणि 585 शुद्धतेचे सोने 446 रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे, एक किलो चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, आज ते 1000 रुपयांनी महागले आहे. आताचे लेटेस्ट दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
मिस कॉलवरुन जाणून घ्या सोन्या चांदीचे दर!
सुटीच्या दिवशी दर जाहीर केले जात नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय, वारंवार अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही https://www.ibja.co ला भेट देऊ शकता.