सोने आणि चांदी तेजीत असणाऱ्या काळात आज तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी आहे. आज सोन्याचा भाव 57,930 रुपयांच्या आसपास आहे. सोन्याच हे दर प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे आहेत. सराफा दुकानांमधील किमती देखील जिल्ह्यानुसार भिन्न असू शकतात. वाहतूक कर, इंधन दरवाढ याचा देखील परिणाम सोने खरेदीवर बघायला मिळतो.
सोने आणि चांदी स्वस्त
आज सराफा बाजारात सोन्याचा भाव 540 रुपयांनी घसरले आहेत आणि 57,930 रुपये प्रति 10 ग्रॅम किमतीत ग्राहकांना आज सोने खरेदी करता येणार आहे. त्याच वेळी, गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव 58,470 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. याशिवाय चांदीचा भावही 900 रुपयांनी घसरून 73,800 रुपये प्रति किलोवर बंद झाला. काल चांदीची किंमत 74,700 प्रति किलो इतकी नोंदवली गेली होती. सोन्याचे भाव 60,000 पार होतील अशी चर्चा भारतीय बाजारांमध्ये असताना सोन्या-चांदीचे भाव उतरल्यानंतर सामान्य नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली पाहायला मिळते आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातसोन्याची घसरण
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. परदेशी बाजारात सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव गेल्या काही दिवसांपासून घसरताना दिसतो आहे.
जाणून घ्या तज्ज्ञांचे मत काय आहे?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरवाढीचा इशारा दिल्यानंतर सोन्याच्या किमती नऊ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या होत्या. त्यामुळे भारतात देखील सोन्याची आणि चांदीची भाववाढ बघायला मिळाली होती. यानंतर, गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे, सोन्याचे भाव त्यांच्या सर्वोच्च स्तरावरून खाली आले आणि गुरुवारी 1.94 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्च विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी म्हटले आहे की, आज आपण सराफा बाजारात अधिक अस्थिरता पाहू शकतो, कारण गुंतवणूकदार अमेरिकेतील बिगरशेती रोजगार, बेरोजगारी दर यावर लक्ष केंद्रित करत आहेत, सोन्या-चांदीच्या गुंतवणुकीत कमी पैसे खर्च होत असल्यामुळे हे चित्र बघायला मिळते आहे.