Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold and Silver Rates Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या किंमतीत घट

Gold Price Today, Silver Price, MCX

Gold and Silver Rates Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत घट झाल्याचे पहायला मिळाले. लग्नसमारंभाच्या या महिन्यात दागिने खरेदीदारांची पाऊलं आपसुकच ज्वेलर्सच्या दुकानांकडे वळतात.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत घट झाल्याचे पहायला मिळाले. लग्नसमारंभाच्या या महिन्यात दागिने खरेदीदारांची पाऊलं आपसुकच ज्वेलर्सच्या दुकानांकडे वळतात. मागील काही दिवसांमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात चढ-उतार पहायला मिळत आहे. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव रविवारी ट्रेडिंग प्राइसपेक्षा स्थिर राहिला असून सोमवारी सकाळी तो 53 हजार 20 रुपयांना विकला जात होता. दरम्यान, 21 नोव्हेंबर रोजी एक किलोग्रॅम चांदीच्या किंमतीत घट झाली असून त्याची विक्री 60,600 रुपयांनी झाली आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव सोमवारी 48,600 रुपये झाला आहे. चेन्नईत याची किंमत 49,250 रुपये, दिल्ली, जयपूर आणि लखनऊमध्ये 48,800 रुपये आहे.

सोनं आणि चांदीचे आजचे भाव (Today’s Gold and Silver Rates)

21 नोव्हेंबर रोजी एक किलो चांदीचा भाव मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि पुणे या बहुतेक प्रमुख शहरांमध्ये 60,600 रुपये होता. तर बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद या ठिकाणी चांदी 67,500 रुपये प्रति किलो विकली जात होती. तर 22 कॅरेटचे एक ग्रॅम सोने आज सकाळी 4,860 रुपये होते, तर 8 ग्रॅमची किंमत 38,880 रुपये होती. 10 ग्रॅम सोन्याची  किंमत 48,600 रुपयांनी, तर 100 ग्रॅमची किंमत 4,86,000 रुपये आहे.

सोन्याच्या किंमतीत बदल का होतात? (Why is there a change in the price of gold?)

राज्यांमधील स्थानिक पातळीवरील कर, उत्पादन शुल्क आणि वेगवेगळे मेकिंग चार्जेस यामुळे सोन्याच्या दागिन्यांचे दर देशभरात वेगवेगळे आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याने महागाईच्या विरोधात चांगली कामगिरी केली होती आणि त्यामुळे गुंतवणूकदार त्याकडे एक मौल्यवान मालमत्ता म्हणून पहात आहेत.

चांदी महाग का होते? (Why silver become expensive?)

भारतात चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतीतील बदलांवरून ठरते. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या चलनवलनावरही ते अवलंबून असते. जर रुपया आपल्या आंतरराष्ट्रीय समकक्षांच्या तुलनेत घसरला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतींमध्ये सातत्य राहिले, तर चांदी अधिक महाग होते.