Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Study In Abroad: शिक्षणासाठी परदेशात जाताय? स्कॅम टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

Study In abroad

Image Source : www.studyabroadaide.com

Study In Abroad: शिक्षणासाठी परदेशात जायचे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. यासाठी पालक मंडळी आधीपासूनच तयारी करतात. पण, परदेशात सगळ नवीन असल्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती टाळण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते. तसेच, परदेशात शिक्षण घेणे म्हणजे आयुष्याला नवी दिशा मिळणार असते. त्यामुळे बरेच जण हा पर्याय निवडतात. आता काही अंशी स्काॅलरशिप आणि खास परदेशी शिक्षणासाठी केलेली गुंतवणूक यामुळे पालक त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवत आहेत. मात्र, तिथे सगळ्या गोष्टी नवीन असल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते. त्यासाठी काही गोष्टींसाठी आधीच तयार राहावे लागते. त्यामुळे फसवणूक टाळता येऊ शकते.

आधी रिसर्च करा

जेव्हा तुम्ही परदेशात शिक्षण घ्यायचा विचार करता तेव्हा त्याविषयी रिसर्च करणे आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी ज्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचे आहे, ते या गोष्टीला जास्त महत्व देत नाहीत. मग अशा अभ्यासक्रमाची निवड करतात, ज्यांचा त्यांना फारसा फायदा होत नाही. 

त्याशिवाय ज्या ठिकाणी शिक्षण घ्यायचे आहे, त्या संस्थेविषयी ऑनलाईन रिसर्च करणे ही आवश्यक आहे. तसेच, प्रवेशासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कोणता कोर्स निवडायला पाहिजे. याविषयी सर्च करावे लागेल. तेव्हाच तुम्हाला पाहिजे तो कोर्स करता येईल.

आर्थिक बाबी समजून घ्या

जेव्हा विद्यापीठाकडून ऑफर लेटर प्राप्त होते, त्याद्वारे त्या प्रवेशासाठी पाहिजे असणाऱ्या आर्थिक गरजा समजून घेणे आवश्यक आहे. यामध्ये जमा करायची रक्कम, रिफंड पाॅलिसी आणि अन्य बाबींचा समावेश असतो. तसेच, व्हीसा नाकारल्यास, त्यासाठी रिंफड पाॅलिसी काय आहे. 

याविषयी देखील रिसर्च करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या गोष्टी माहिती नसल्यास नंतर अडचणी येऊ शकतात. तसेच, अशावेळी ते फसव्या लोकांशी किंवा वेबसाईटशी व्यवहार करु शकतात. त्यामळे परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते.

हाऊसिंग स्कॅमपासून राहा सावध

परदेशात शिक्षणासाठी जायचे म्हटल्यावर कुठे राहायचे हा प्रश्न असतो. तो सहसा नातेवाईक किंवा कॅम्पसमध्ये नोंदणी केल्यावर सुटतो. मात्र, काही वेळा एखाद्या विद्यार्थाकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतात. तेव्हा ते आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या वसतिगृहाची निवड करु शकतात. 

तसेच, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना स्थानिक सरकारने उपलब्ध करून दिलेल्या खाजगी निवासस्थानातही ते राहू शकतात. शक्यतो सरकारशी संबंधित संस्थेमध्ये राहण्याचा पर्याय निवडावा. बाहेर पाहायला गेला तर काहीच माहिती नसल्यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते.

वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवावी

सध्या सायबर क्राईममध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे वैयक्तिक माहितीची काळजी घेणे गरजेचे आहे. परदेशात शिक्षण घेताना ओळखीची चोरी किंवा इतर स्कॅम टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. तसेच, पासपोर्ट, सामाजिक सुरक्षा क्रमांक, बँक खाती यासारखी माहिती विश्वासार्ह संस्था वगळता अन्य कोणासोबतही शेअर करू नये.

महत्वाची माहिती हवी आहे?

परदेशात शिकायला जाणे म्हणजे तिथली माहिती मिळवणे थोडे अवघड असते. पण, यासाठी विद्यार्थी फक्त दूतावास अलर्ट (Embassy Alerts) आणि विश्वसनीय चर्चा ग्रृप यासारख्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती मिळवू शकतात. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी राहते. तसेच, सर्व माहिती अचूक मिळायला मदत होते.

देश सोडून परदेशात शिक्षण घ्यायला जायचे महटल्यावर बऱ्याच गोष्टींवर लक्ष द्यावे लागते. नाहीतर अनोळखी देशात अडचणींना सामोर जावे लागू शकते. त्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जात असल्यास वरील गोष्टी नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील. त्यानुसार तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकाल.