Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GoMechanic Layoffs: गो मॅकेनिक कंपनीने 70 टक्के कर्मचारी कपात करण्याची घोषणा, या कंपनीवर तब्बल 120 कोटींचे कर्ज

GoMechanic Layoffs

What happened at GoMechanic: जानेवारी सुरूवातीपासूनच कर्मचारी कपात करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. आता GoMechanic नेदेखील 70 टक्के कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवुयात.

Who is Owner of GoMechanic: जागतिक मंदीचा फटका नोकरदार वर्गावर पडला असल्याचे दिसत आहे. एकापाठोपाठ कित्येक कंपन्या कर्मचारी कपात असल्याचे पाहायला मिळत आहे. गुगल, अॅमेझाॅन, ट्विटर, गुगल, शेअरचॅट, स्नॅपसारख्या इतर ही अनेक मोठ-मोठया व नामांकित कंपन्यावरदेखील कर्मचारी कपात करण्याची वेळ आली आहे. आता या सर्व कंपन्यांनंतर गो मेकॅनिक (GoMechanic) कंपनीदेखील 70 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याच्या तयारीत आहे. याविषयी अधिक माहित जाणून घेवुयात.  

गो मेकॅनिक (GoMechanic) कंपनी संबंधित माहिती

GoMechanic ही एक स्टार्टअप कंपनी आहे. साधारण 2016 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. वाहनधारक व दुरूस्तीधारक म्हणजे गॅरेज यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याची सुरूवात या कंपनीने केली होती. खूप कमी वेळेत या कंपनीने मोठी गुंतवणूक केली व सोबतच विस्तारदेखील वाढविला. साधारण दोन वर्षापूर्वी या कंपनीने 42 मिलियन डाॅलर इतकी गुंतवणूक करून कंपनी उभी केली. यासाठी त्यांनी अनेक दिग्गज गुंतवणूकदारांकडून मदतदेखील घेतली. मात्र काही महिन्यातच कंपनीने हे आकडे चुकीचे असल्याचे सांगितलेदेखील आहे.

सहसंस्थापक अमित भसीन काय म्हणतात? 

GoMechanic कंपनीचे सहसंस्थापक अमित भसीन (Co-founder Amit Bhasin) यांनी एका पोस्टव्दारे सांगितले की, आम्ही कंपनीचे आर्थिक उलाढालींचे आकडे चुकीचे असल्याचे मान्य केले आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगात, आम्ही आपल्या उद्दिष्टाची पूर्तीकडे दुर्लक्ष केले व कंपनीच्या विकासाची आकडे चुकीचे सादर केले, यासाठी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगतिले.

70 टक्के कर्मचारी कपात (70 Percent Staff Reduction)

भसीन यांनी या पोस्टमध्ये सांगितले की, कंपनीमधून 70 टक्के कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. पुन्हा कंपनीच्या व्यवस्थापनाची योग्य व अचूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे आम्हाला हा वेदनादायक निर्णय घ्यावा लागत आहे. तसेच तटस्थ अशा एका संस्थेमार्फत कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचं ऑडिटदेखील करण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले. 

120 कोटींचे कर्ज (120 Crore Loan)

GoMechanic या कंपनीचे मुख्यालय गुरूग्राम येथे असून सध्या या कंपनीवर 120 कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी कंपनीला पुन्हा बाजारपेठेतून निधी उभा करावा लागणार आहे. नफ्याचे चुकीचे आकडे जाहीर केल्यामुळे आर्थिक उलीढालींवर मोठा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. थोडक्यात, कंपनीची एक चूक, महागात पडली म्हणण्यास हरकत नाही.