Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Coal Consumption Increased: जगभरात कोळशाची मागणी का वाढतेय?

Coal Consumption Increased

जागतिक पातळीवर कोळशाचा वापर वाढत असल्याचे International Energy Agency -IEA ने म्हटले आहे. 2022 वर्षात सर्वाधिक कोळशाचा वापर झाला असेल. तसेच पुढील काही वर्ष कोळशाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होईल, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील घडामोडी यासाठी कारणीभूत असल्याचे IEA ने म्हटले आहे.

क्लिन एनर्जीचा वापर आणि निर्मितीचा जगभर प्रचार आणि प्रसार सुरू आहे. प्रदूषणाची समस्या गंभीर बनल्याने अपारंपारिक ऊर्जा स्रोतांवर भर दिला जात आहे. मात्र, एक चिंता वाढवणारी माहिती जागतिक ऊर्जा एजन्सीने केलेल्या अहवालातून समोर आली आहे. जागतिक पातळीवर कोळशाचा वापर वाढत असल्याचे International Energy Agency -IEA ने म्हटले आहे. 2022 वर्षात सर्वाधिक कोळशाचा वापर झाला असेल. तसेच पुढील काही वर्ष कोळशाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होईल (Coal Consumption Increased) असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील घडामोडी यासाठी कारणीभूत असल्याचे IEA ने म्हटले आहे.  

युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम (Impact of Russia- Ukraine War) 

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागितक स्तरावरील इंधन साखळी विस्कळीत झाली. रशियाकडून युरोपीयन देशांना नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. या पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यामुळे नैसर्गिक वायूच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या. सोबतच जगभरात मंदी आणि महागाई वाढू लागली. वायूच्या किंमती वाढू लागल्याने अनेक देश ऊर्जेचा स्वस्त स्रोत म्हणून पुन्हा कोळशाचा वापर करू लागले आहेत. 

उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळामुळे ऊर्जेची मागणी वाढली (Heat wave and Drought led high coal demand) 

जगभरातील काही भागात उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ऊर्जेची मागणी वाढली. दुष्काळामुळे धरणांमधील पाणीसाठी कमी झाल्याने जलविद्युत ऊर्जा प्रकल्पही बंद झाले. अणू ऊर्जा प्रकल्पांमधून होणारी ऊर्जा निर्मितीही पुरेशी नाही. विषेशत: युरोपमध्ये अणू ऊर्जा निर्मिती कमी होत आहे. फ्रान्स देशाने तर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे आण्विक ऊर्जा प्रकल्प बंद ठेवले आहेत. 

आशियाई देशांमध्ये ऊर्जेची मागणी (High Energy demand in Asia Region) 

2022 वर्षात जगभरात 8 बिलियन टन पेक्षा जास्त कोळसा ऊर्जा निर्मितीसाठी जाळला जाईल. एवढा कोळसा या आधी 2013 साली जाळला गेला होता. तो रेकॉर्डही 2022 सालात मोडीत निघेल. आशियाई देशांमधील ऊर्जेची वाढती मागणी पाहता पुढील काही वर्ष कोळशाला मागणी जास्त राहील, असे अहवालात म्हटले आहे. याचा परिणाम म्हणजे प्रदूषणातही वाढ होईल. 

भारतामध्ये कोळशाची सर्वाधिक मागणी (India will have high Coal demand) 

येत्या काळात भारतामध्ये कोळशाची मागणी 7 टक्क्यांनी वाढेल. युरोपीयन देशांमध्ये 6 टक्के तर चीनमध्ये 0.4 टक्के कोळशाची मागणी वाढेल, असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. रशियामधून युरोपला वायू पुरवठा कमी झाल्याने युरोपियन देशही कोळशाकडे वळले आहेत. 2025 नंतर मात्र, युरोपियन देशांमध्ये वाढलेली मागणी कमी होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोळशाचे उत्पादन घेणारे प्रमुख देश भारत, चीन आणि इंडोनेशिया असून येथे विक्रमी प्रमाणात उत्पादन होईल. मात्र, या क्षेत्रामध्ये म्हणावी तेवढी गुंतवणूक होईल असे दिसत नाही, असे अहवालात म्हटले आहे.