Pay Rent by Credit Card: दरमहा घरभाड्याचे पैसे तुम्ही कसे देता? जर तुम्ही कॅश किंवा डेबिट कार्डने पेमेंट करत असाल तर तुमचा फायदा करणारा एक पर्याय उपलब्ध आहे. क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे देऊन तुम्ही कॅशबॅक, रिवॉर्ड्स आणि ऑफर्स मिळवू शकता. त्यासाठी सर्वोत्तम कोणते ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत. ते पाहूया.
क्रेडिट कार्डद्वारे रेंट देण्याचे फायदे काय?
कॅशबॅक ऑफर्स मिळवा
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे देता तेव्हा तुम्हाला कॅशबॅक ऑफर्स मिळतात. अनेक बँका आणि पोर्टल उपलब्ध आहेत, ज्याद्वारे तुम्हाला हे पेमेंट करता येईल. हा कॅशबॅक थेट तुमच्या खात्यात जमा होईल.
रिवॉर्ड पॉइंट्स आणि ऑफर्स मिळवा
सर्वसाधारणपणे घरभाड्याची रक्कम 10 हजारांपेक्षा जास्त असू शकते. म्हणजे वर्षाचे 1 लाख 20 हजार रुपये क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स आणि शॉपिंगसाठी ऑफर्सही मिळतील. कारण, रेंट तुम्ही कॅश किंवा डेबिट कार्ड ने पे केल्यास काहीही फायदा मिळत नाही. याउलट क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळतील. हे रिवॉर्ड पॉइंट तुम्ही नंतर खरेदीसाठी किंवा बिल पेमेंटसाठी वापरू शकता.
क्रेडिट स्कोअर वाढण्यास मदत
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट करता तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर वाढण्यासही मदत होईल. जर तुमचा सिबिल स्कोअर 750 पेक्षा कमी असेल आणि तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे रेग्युलर घरभाडे दिले तर स्कोअर वाढू शकतो. मात्र, एकूण क्रेडिट लिमिटपैकी किती पैसे दरमहा खर्च करता याचे भान ठेवा. 30% पेक्षा कमी रक्कम खर्च करावी. अन्यथा जास्त वापर केल्यास स्कोअर कमीही होऊ शकतो.
वेळेवर रेंट पेमेंट करण्यास मदत
जर तुमचा पगार महिन्याच्या 6-7 तारखेला होत असेल तर सॅलरीची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे आधीच पेमेंट करू शकता. सुमारे 45 दिवस तुम्हाला क्रेडिट कालावधी मिळेल. पगार झाल्यानंतर तुम्ही कार्ड पेमेंट करू शकता. ऑनलाइन पेमेंट करताना प्रत्येकवेळी घरमालकाचे नाव अॅड करण्याची गरज नाही.