Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cashify वर मोबाईल विकून मिळवा इंस्टंट पैसे आणि वाजवी किंमत, जाणून घ्या फायदे

Cashify

बहुतांश लोक जुना मोबाईल फोन घरातच ठेवणे पसंत करतात. परंतु मोबाईलचा वापर न केल्यास तो खराबही होतो. त्यामुळे उपयोगात नसलेला मोबाईल विकणे हे शहाणपणाचे ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात, Cashify तुम्हांला यात कशाप्रकारे मदत करेल ते…

तुम्ही Cashify ची जाहिरात कुठे ना कुठे पहिली असेल. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमचा जुना मोबाईल फोन एकदम आरामात आणि चांगल्या किमतीत विकू शकता. अनेकदा तुम्हांला तुमचा जुना फोन विकायचा असतो, मात्र ग्राहक मिळत नाही. त्यातच एखादा ग्राहक मिळाला तर तो काहीही किंमत सांगतो. अशावेळी बहुतांश लोक जुना मोबाईल फोन घरातच ठेवणे पसंत करतात. परंतु मोबाईलचा वापर न केल्यास तो खराबही होतो. त्यामुळे उपयोगात नसलेला मोबाईल विकणे हे शहाणपणाचे ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात,  Cashify तुम्हांला यात कशाप्रकारे मदत करेल ते…

किंमत लगेच ठरणार

Cashify नावाने प्लेस्टोअरवर तुम्ही कॅशिफायचे अधिकृत ॲप डाऊनलोड करू शकता. ॲपवर तुम्ही वापरलेल्या डिव्हाइससाठी डिव्हाइसचा ब्रँड, मॉडेल, त्याची सद्यस्थिती आणि त्यासोबत आलेल्या कोणत्याही ॲक्सेसरीजबद्दलचा सविस्तर तपशील द्यावा लागेल.

ॲपद्वारे तुमचा मोबाईल चेक केला जाईल आणि त्यात काही बिगड आढळल्यास तुम्हांला कळवले जाईल. तुमच्या मोबाईलची सद्यस्थिती लक्षात घेऊनच तुमच्या मोबाईलची किंमत ठरवली जाते हे ल्शात असू द्या. ही प्रोसेस पूर्ण झाली कीत्यानंतर तुम्हाला लगेचच सदर मोबाईलची किंमत किती आहे हे सांगितले जाईल. तुम्हाला जर ती किंमत परवडत असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल विकू शकता.

डोअरस्टेप मोबाईल पिकअप

जर तुम्ही तुमचा मोबाईल विकण्याचा निर्णय घेतला असेल तर ‘Doorstep Pickup’ चा पर्याय निवडून तुम्ही संमती देऊ शकता. तुम्ही नमूद केलेल्या दिवशी, ठराविक वेळी  कॅशिफाय प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन तुमचा मोबाईल घेऊन जाईल आणि तुमच्या मोबाईलची चेकिंग करून तुम्हाला त्याबदल्यात पैसे दिले जातील.

डेटा गोपनीय ठेवला जातो 

कॅशिफाई कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनी ग्राहकांच्या डेटाची गोपनीयता आणि सुरक्षिततेवर अधिक भर देते. यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईलची विक्री करण्यापूर्वी त्यांचा वैयक्तिक डेटा, माहिती डिलीट करण्याची सूचना केली जाते. तसेच जेव्हा कॅशिफाय प्रतिनिधी तुमचा मोबाईल कलेक्ट करण्यासाठी घरी येतील तेव्हा ते तुमच्यासमोर मोबाईल रिसेट करतील.

ऑफर्सचा फायदा 

कॅशिफायच्या माध्यमातून जसे तुम्ही तुमचा जुना मोबाईल फोन विकू शकतात तसेच तुम्ही तुमचा मोबाईल सर्व्हिसिंग (सॉफ्टवेअर अपडेट) , रिपेअर किंवा  अपग्रेड देखील करू शकता. Cashify मोबाईल ॲपवरून बुकिंग केल्यास तुम्हाला सवलत देखील दिली जाईल. याशिवाय ग्राहकांना त्यांचे जुने मोबाईल एक्सचेंज करण्याची देखील सुविधा इथे मिळते.