Global Economic Recession : भारतीय स्टार्टअप्समध्ये निधीची कमतरता जाणवत असल्याने, अनेक स्टार्टअप्स बंद पडले. तसेच गुंतवणूकदारांनी वाढलेले मूल्यमापन आणि महागाईमुळे विक्री कमी झाल्याने अनेक स्टार्टअप्स अद्यापही ऑक्सिजनवर आहेत.
Table of contents [Show]
तिमाहीच्या आकड्यातील फरक
डेटा फर्म CB इनसाइट्सच्या आकडेवारीनुसार, भारतातील स्टार्टअप्सनी 2023 च्या पहिल्या तिमाहीत फक्त 2 बिलियन डॉलर कमावले. जे वर्ष 2022 च्या कालावधीपेक्षा 75% कमी आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षातील तिमाही मधील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. यावर्षीची आर्थिक वाढ ही 10 अब्ज डॉलरपेक्षा कमीच दिसून येत आहे. ही वाढ 2021 मध्ये 30 अब्ज डॉलर आणि 2022 मध्ये 20 बिलियन डॉलर पेक्षा जास्त होती.
जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप्स कंपन्यांना नवा भारताचा कणा असे संबोधले आहे. तर दुसरीकडे सुरु असलेली जागतिक आर्थिक मंदी ही स्टार्टअप्स करीता धोकादायक ठरत आहे. याचा फटका आर्थिक विकासाला आणि तरुणांच्या भविष्याला बसु शकतो, कारण मार्केटमध्ये मंदी आल्यास, नवीन नोकऱ्या मिळणे आणि आहे त्या टिकविणे तरुणांसाठी कठीण होईल.
डिजीटल व्यवसायही ठप्प झाले
कोरोना काळात आलेल्या डिजीटलच्या लाटेमुळे अनेक स्टार्टअप्सना कोरोडो रुपयांचा फायदा झाला. मात्र त्यानंतर अमेरिका आणि चीन मधील स्टार्टअप्स सुध्दा पहिल्या तिमाहीत अनुक्रमे 32.5 अब्ज डॉलर आणि 5.6 अब्ज डॉलरने घसरले.
अनेक कंपन्या तोट्यात
अलिकडच्या आठवड्यात, BlackRock ने भारतीय ऑनलाइन एज्युकेशन फर्म Byju चे मूल्यांकन 22 बिलियन डॉलर वरून 11.15 बिलियन डॉलर केले आहे, तर Invesco ने फूड डिलिव्हरी फर्म Swiggy चे मूल्यांकन एक चतुर्थांश कमी करून 8 बिलियन डॉलर केले आहे. वर्षानुवर्षे भारतात फंडिंग बूमचे नेतृत्व केल्यानंतर, जपानच्या सॉफ्टबँकने गेल्या एका वर्षात देशात एकही नवीन गुंतवणूक केलेली नाही, कारण ते मूल्यांकनात आणखी सुधारणा होण्याची वाट पाहत आहे. अश्याप्रकारे आर्थिक मंदीचे जगाला असे फटके बसत आहे.