रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सोमवारी (दि. 20 जून) नॉन-बँक वॉलेट (Non-Bank Wallet) आणि प्री-पेड कार्ड्सना (Pre-Paid Cards)प्री-पेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटस (Pre-Paid Payment Instrument-PPI) प्लॅटफॉर्मवर त्यांच्या क्रेडिटलाईन लोड करण्यास परवानगी नाकारली आहे. याबाबत इकॉनॉमिक टाईम्सने वृत्त दिले आहे. बॅंकिंग नियामक मंडळाने नॉन-बँक प्री-पेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सला परिपत्रक पाठवून त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून अशा नॉन-बॅंकिंग कंपन्यांची कार्ड लोड करण्याची सेवा थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
आरबीआयच्या मार्गदर्शक गाईडलाईननुसार, क्रेडिट लाईन्सवरून पीपीआय लोड करण्याची परवानगी नाकारली आहे. परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की, मार्गदर्शक गाईडलाईन्सचे पालन न करणाऱ्यांवर पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम्स कायदा, 2007 अंतर्गत तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते.
बँकिंग नियामक मंडळाने दिलेला हा आदेश म्हणजे, कार्ड फिनटेक आणि क्रेडिटलाईन ऑफर करण्यासाठी बँकांशी करार केलेल्या नवीन कंपन्यांना रोखण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, स्लाइसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन बजाज (Rajan Bajaj, founder and CEO of Slice) यांनी म्हटले आहे की, आम्ही या नियमांचे मूल्यमापन करत असून नियमांचे पालन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या भागीदार असलेल्या बॅंकांसोबत यावर काम करत आहोत.
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रोख रक्कम, बँक खाते, क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून प्री-पेड उपकरणे लोड करण्याची परवानगी देत आहे. पण ही उपकरणे टॉप-अप करण्यासाठी क्रेडिटलाईन वापरण्याची परवानगी देत नाहीत.