Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Free Life Insurance with SIP : 'एसआयपी'सोबत मिळतो मोफत इन्शुरन्स; जाणून घ्या काय आहे योजना

SIP

गुंतवणूक आणि विमा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेक म्युच्युअल फंड कंपन्या SIP द्वारे त्यांच्या योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांना अतिरिक्त लाभ म्हणून मोफत मुदत जीवन विमा देत (Free Insurance with SIP)आहेत. विशेषत: कोरोना काळापासून यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुंतवणूकदार एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असताना त्याला संबंधित संस्थेकडून मोफत मुदत विमा दिला जातो.

Free Insurance with SIP : सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा बचतीचा एक चांगला मार्ग आहे. परंतु, SIP मध्ये फक्त गुंतवणूकच होते असे नाही तर अन्य काही सुविधा देखील या माध्यमातून उपलब्ध होतात. म्हणजे तुमच्या SIP मध्ये तुम्हाला मोफत जीवन विमा देखील प्राप्त होतो. अनेक म्युच्युअल फंड कंपन्या  "Free Insurance with SIP''  ही सुविधा देत आहेत. तसेच तुम्हाला या विमा कवचासाठी कोणत्याही अतिरिक्त प्रिमियमची आवश्यकता नाही. तो तुमच्या  म्युच्युअल फंड SIP सोबत मोफत प्राप्त होते. यामध्ये तुम्हाला 50 लाख रूपयांपर्यंतचा जीवन विमा मिळू शकतो.

SIP विमा म्हणजे काय? SIP Insurance

गुंतवणूक आणि विमा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेक म्युच्युअल फंड कंपन्या SIP द्वारे त्यांच्या योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांना अतिरिक्त लाभ म्हणून मोफत मुदत जीवन विमा देत आहेत. विशेषत: कोरोना काळापासून यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुंतवणूकदार एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असताना त्याला संबंधित संस्थेकडून मोफत मुदत विमा दिला जातो. त्यालाच एसआयपी विमा म्हणून ओळखले जाते. यामध्ये SIPची रक्कम आणि मुदत या दोन्हीच्या आधारावर विमा संरक्षण ठरवले जाते.

SIP विमा कसा कार्य करतो?

म्युच्युअल फंडात एसआयपी द्वारे जे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात त्यांना हे विमा सुरक्षा कवच मोफत दिले जाते. हा एक प्रकारे समूह मुदत विमा संरक्षण(Group Term insurance) म्हणून दिला जातो. तसेच हे जीवन विमा संरक्षण हे SIP च्या रकमेच्या प्रमाणात असते आणि जोपर्यंत गुंतवणूकदार गुंतवणूक ठेवतो (मूदत कालावधी) तोपर्यंत या विम्याची वैधता कायम राहते. हे विमा संरक्षण एसआयपी मधील गुंतवणुकीच्या रकमेच्या 20 ते 120 पटीपर्यंत असू शकते

एसआयपी विमा संरक्षणाचा लाभ कसा मिळतो? 

समजा जर तुमची मासिक SIP 10,000 रुपये प्रति महिना असेल तर पहिल्या वर्षाचा कव्हरेज हा 20 पटीने असतो(10,000 x 20 = 200000) दुसऱ्या वर्षी 50 पटीने कव्हरेज ग्राह्य धरल्यास ( 10,000 x 50 = 500000) आणि तिसऱ्या वर्षानंतर 100 पटीने ग्राह्य धरला तर तो (10,000 x 100= 1000000) तुम्हाला 10 लाखांपर्यंतचे पर्यंतचे विमा कव्हरेज मिळू शकते. समजा गुंतवणूकदार व्यक्ती तिसऱ्या वर्षानंतर मरण पावली तर त्याच्या नामनिर्देशित वारसदारास विम्याची रक्कम आणि SIP ची गुंतवणूक केलेली रक्कम प्राप्त होते. दरम्यान, SIP Insurance देणाऱ्या प्रत्येक संस्थेचे नियम वेगवेगळे असू शकतात.

वयोमर्यादा आणि समाप्ती योजनेच्या अटी Terms & Conditions  

  • या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय किमान 18 ते  51 वर्षे असावे 
  • किमान 3 वर्षे नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल.
  • एसआयपी तीन वर्षापूर्वी बंद झाल्यास विम्याचे लाभ संपुष्टात येतात
  • विमा संरक्षण जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंत असेल