Ways To Reduce Medical Expenses: वैद्यकीय खर्च जास्त असल्याने लोकांची बचतही संपुष्टात येत असते. त्याच वेळी, उत्पन्न कमी असताना वैद्यकीय खर्चाचे व्यवस्थापन करणे सोपे नाही. तुमची कमाई अनेकदा वैद्यकीय खर्चामुळेच निघून जाऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे आरोग्य विमा असल्यास,तुमचा होणारा अतिरिक्त खर्च बचत करता येतो.
असे अनेक वैद्यकीय खर्च आहेत, जे आरोग्य विमा मध्ये कव्हर केले जाऊ शकत नाहीत. तसेच सामान्यत: रुग्णाला २४ तासांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल केल्यासच आरोग्य पॉलिसींचा खर्च भागवला जातो. अशापरिस्थितीत तुमचा जास्त पैसा खर्च होतो. आज आपण असे चार मार्ग जाणून घेणार आहोत, जे तुमच्या वैद्यकीय खर्चाचे योग्य व्यवस्थापन करुन, तुमचे पैसे बचत करण्यास मदत करेल.
Table of contents [Show]
ओपीडी सदस्यत्व योजना
वैद्यकीय खर्च व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही आरोग्य वित्तपुरवठा (Health Financing) चा ऑपशन निवडू शकता. तुम्ही मेडिकलवर सबस्क्रिप्शन योजना देखील घेऊ शकता. एकदा जर तुम्ही या योजनांचे सदस्यत्व घेतले, तर तुम्ही अनेकदा आपले हेल्थ चेकअप करु शकता.
ओपीडी कव्हर
जर तुम्हाला हेल्थ पॉलिसी घ्यायची असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला, ओपीडी आणि इतर खर्च कव्हर करणारी पॉलिसी घ्यावी.अशा पॉलिसीमुळे तुमचा वैद्यकीय खर्च कमी होण्यास मदत होईल. भारतातील आरोग्यावरील खर्चाच्या जवळपास 70 टक्के खर्च हा डॉक्टरांचा सल्ला, ओपीडी आणि इतर खर्चावर होतो.
प्रतिबंधात्मक सेवांचा लाभ
ओपीडी खर्च कमी करण्यासाठी हे आणखी एक प्रभावी धोरण आहे. तुम्ही तुमच्या आधीच काढलेल्या आरोग्य विमाअंतर्गत लसीकरण,स्क्रीनिंग आणि वार्षिक तपासणी (Yearly Health Checkup) यासारख्या प्रतिबंधात्मक सेवांचा लाभ नक्की घ्या.
आजीबाईचा बटवा आहे ना!
अगदी साध्या सर्दी-पडशाला देखील काही जणांना मोठ्या डॉक्टरांकडे जाण्याची सवय असते. नको तेव्हा घेतलेल्या अँटीबायोटिक्समुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे शक्य तेव्हा आपल्या घरातील आजी बाईचा बटव्याचा वापर करुन, तयार केलेल्या हर्बल औषधी घ्या. यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि आजारही बरा होईल.
निरोगी जीवनशैली
तुम्ही तुमच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या आणि नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, चांगली झोप घ्या, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निरोगी जीवनशैलीमुळे तुमचा एकूण वैद्यकीय खर्च आणि ओपीडी खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.