Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Foreign Exchange Reserves : परकीय चलनाने सरकारची तिजोरी भरली! सोन्याच्या साठ्यात देखील लक्षणीय वाढ

Foreign Exchange Reserves

Foreign Exchange Reserves : केंद्र सरकारच्या परकीय चलनाच्या साठ्यात सुमारे 6 अब्ज डॉलर्स इतकी वाढ झाली आहे आणि हे मूल्य आता 579 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचले आहे तर सोन्याचा साठा 45.48 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

Foreign Exchange Reserves : केंद्र सरकारच्या परकीय चलनाच्या साठ्यात सुमारे 6 अब्ज डॉलर्स इतकी वाढ झाली आहे आणि हे मूल्य आता 579 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचले आहे तर सोन्याचा साठा 45.48 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. अहवालानुसार देशाचा परकीय चलन साठा 5.977 अब्ज डॉलरने वाढून  578.78 अब्ज डॉलर्स झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी 31 मार्च 2023 रोजी ही माहिती दिली. मागील आठवड्यात परकीय चलनाचा साठा 12.8 अब्ज डॉलरने वाढून 572.8 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. यापूर्वी, ऑक्टोबर 2021 मध्ये देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने  645 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका उच्चांक गाठला होता.

FCA 509.72 अब्ज डॉलर्स (FCA 509.72 billion dollars)

जागतिक घडामोडींमुळे रुपयाच्या दरात झालेल्या तीव्र घसरणीचा सामना करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने राखीव (FCA) निधीचा वापर केल्यामुळे यात घट झाली होती. आरबीआयच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 24 मार्च रोजी परकीय चलन मालमत्ता, देशांतर्गत परकीय चलन साठा 4.38 अब्ज डॉलर्सने वाढून 509.728 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. 

सोन्याचा साठा ४५.४८ अब्ज डॉलर्स (Gold Reserves 45.48 Billion Dollars)

विदेशी चलन म्हणजेच डॉलर्स युरो, पाउंड व येन यांसारख्या विदेशी चलनांच्या किमतीत झालेल्या हालचालीचा थेट परीणाम देशाच्या तिजोरीवर होत असतो. यामुळे  गेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 1.37 अब्ज डॉलर्सने वाढून 45.48 अब्ज डॉलर्स इतके झाले आहे.

IMF मध्ये 27 दशलक्ष डॉलर्सची  ठेव (A Deposit of 27 Million Dollars With IMF)

सरकारी आकडेवारीनुसार, स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) देखील 201 दशलक्ष डॉलर्सने वाढून 18.419 अब्ज डॉलर्स झाला आहे. गेल्या आठवड्यात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे ठेवलेला देशाचा चलन साठा देखील 27 दशलक्ष डॉलर्सने वाढून 5.151 अब्ज डॉलर्स झाला आहे.

www.zeebiz.com