• 09 Feb, 2023 07:41

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ford Layoff: जागतिक आर्थिक मंदीचे सावट, फोर्ड हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत

Ford Layoff

Image Source : www.autospies.com

Ford Layoff News: जागतिक आर्थिक मंदीचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील आयटी कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. IT कंपन्यांपाठोपाठ आता वाहन क्षेत्रातही कर्मचारी कपात होण्याची शक्यता दिसू लागली आहे. फोर्ड (Ford) या जगप्रसिद्ध मोटार कंपनीने आपल्या 3200 कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी केली असल्याचे समजते आहे.

Ford Layoff News: आयटी कंपन्यांनंतर, ऑटो क्षेत्रातील कंपन्याही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहेत, अमेरिकन कार निर्माता कंपनी फोर्ड मोटरने 3200 लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना तयार केली असल्याची बातमी आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे म्हटले जात आहे की फोर्ड आता इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करणार आहे. या दिशेने काम करण्यासाठी आणि  खर्च कमी करण्यासाठी कंपनी हा मोठा निर्णय घेत आहे.

Ford Layoff चा येथे प्रभाव पडेल

फोर्ड मोटर कंपनीच्या या कर्मचारी कपातीचा कंपनीच्या उत्पादन विकासात (Product Development) काम करणाऱ्या लोकांवर आणि कंपनीच्या जर्मनी कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर परिणाम बघायला मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोर्डच्या या निर्णयामुळे युरोपमधील 65 टक्के विकास नोकऱ्यांवर परिणाम होईल. फोर्ड कंपनी प्रशासक विभागातील 700 आणि विकास कार्य विभागातील (Development Work Department) 2500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

IG Metal ने दिलेल्या निवेदनानुसार, फोर्ड मोटर जर्मनीहून अमेरिकेत आपला विकास उपक्रम (Development Activity) हलवण्याचा विचार करत आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात फोर्डने अमेरिकेतील सुमारे 3,000 लोकांना कामावरून काढून टाकले होते, त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम फार्ले (Jim Farley) म्हणाले की कंपनी नफा वाढवण्यासाठी 3 अब्ज डॉलरची कपात करण्याचा विचार करत आहे जेणेकरून कंपनी इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करू शकेल.

परंतु येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कंपनीने युरोपमध्ये कर्मचारी कपातीची शक्यता नाकारली आहे, कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, अद्याप असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कामगार कपातीचे निर्णय कंपनी आपल्या आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन घेत असते,परंतु अशी अधिकृत घोषणा मात्र अजून केली गेलेली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर माध्यमांनी याबाबतच्या बातम्या दिल्या आहेत.