भारतात गेल्याकाही वर्षात चारचाकी वाहन खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, कारसोबतच आणखी एक गोष्ट अत्यंत गरजेची आहे ती म्हणजे विमा. परंतु, अनेकजण विमा काढत नाहीत. तुम्ही नवीन कार खरेदी करत असाल अथवा तुमच्याकडे जुनी कार असेल, गाडीचा विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे.
मोटार वाहन अधिनियमानुसार सार्वजनिक ठिकाणी धावणाऱ्या प्रत्येक गाडीचा विमा असणे गरजेचे आहे. विमा काढल्याने गाडीचा अपघात झाला, कार चोरीला गेली किंवा अन्य कोणत्या कारणामुळे वाहनाचे नुकसान झाले असल्यास अशा स्थितीमध्ये विमा कंपनीकडून भरपाई मिळते. वेळीच विमा काढल्याने भविष्यात होणारे नुकसान टाळले जाऊ शकते. भारतीय नागरिक कारच्या विम्यावर दरवर्षी हजारो रुपये खर्च करतात. मात्र, तुम्ही काही टिप्स वापरून कार विम्याची रक्कम कमी करू शकता.
कशी ठरते कारच्या विम्याची रक्कम?
कारच्या विम्याची रक्कम ही वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. प्रामुख्याने कारचा प्रकार, त्यातील इंजिननुसार विम्याची रक्कम ठरत असते. गाडी किती वर्ष जुनी आहे, गाडी मालकाचे वय किती आहे, चालकाचा गाडी चालवण्याचा रेकॉर्ड कसा आहे, इंधन सीएनजी आहे की डिझेल?, या गोष्टींवरून देखील कार विम्याची रक्कम ठरते. तसेच, तुम्ही कोणत्या शहरात राहता, आरटीओ झोन व विम्याचा कोणता प्रकार निवडत आहात, यावरून देखील कार विम्याची किंमत ठरत असते. सर्वसाधारणपणे हॅचबॅक गाड्यांच्या विम्याची रक्कम ही एसयूव्ही, सेडान कारच्या तुलनेत कमी असते.
भारतीय वर्षाला कार विम्यावर किती रक्कम खर्च करतात?
भारतीय नागरिक सर्वसाधारण कार विम्यावर वर्षाला 5 हजार रुपयांपासून ते 25 हजार रुपये खर्च करतात. पुढे कारचा प्रकार, स्थान, चालकाचे वय याआधारावर विम्यासाठी येणारा सर्वसाधारण खर्च देण्यात आला आहे.
वाहनाचा प्रकार | स्थान | वयआणि लिंग | वर्षालाकार विम्यासाठी येणारा सर्वसाधारण खर्च |
लहानहॅचबॅक | शहरीभाग | 30 वर्ष , पुरुष | Rs.6,000 - Rs.12,000 |
30 वर्ष महिला | Rs.5,500 - Rs.11,000 | ||
ग्रामीण भाग | 45 वर्ष , पुरुष | Rs.4,500 - Rs.9,000 | |
45 वर्ष , महिला | Rs.4,000 - Rs.8,000 | ||
मध्यमआकाराची सेडान | शहरीभाग | 35 वर्ष , पुरुष | Rs.10,000 - Rs.18,000 |
35 वर्ष , महिला | Rs.9,500 - Rs.16,500 | ||
ग्रामीणभाग | 40 वर्ष , पुरुष | Rs.7,500 - Rs.14,000 | |
40 वर्ष , महिला | Rs.7,000 - Rs.12,500 | ||
एसयूव्ही , लग्झरी कार | शहरीभाग | 40 वर्ष , पुरुष | Rs.15,000 - Rs.30,000 |
40 वर्ष , महिला | Rs.14,000 - Rs.28,000 | ||
ग्रामीणभाग | 50 वर्ष , पुरुष | Rs. 12,000 – Rs. 25,000 | |
50 वर्ष , महिला | Rs. 11,000 – Rs. 22,000 | ||
सोर्स - https://www.policybachat.com/ * सर्वसाधारण आकडेवारीदिली असून , कार विम्याची रक्कम वेगळी असू शकते. |
कार विम्याची रक्कम कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
मल्टी-ईयर पॉलिसी – प्रत्येक नवीन वाहनासाठी जास्त मुदतीचा थर्ड पार्टी विमा आवश्यक आहे. मात्र, लाँग-टर्म विम्याची रक्कम जास्त असू शकते. अशा स्थितीमध्ये तुम्ही लाँग-टर्म विमा घेताना त्यातील तुमच्यामुळे झालेल्या नुकसानीच्या (Own Damage) भागासाठीचा विमा फक्त 1 वर्षासाठी घेऊ शकता. इतर नुकसानीसाठी लाँग-टर्म विमा घ्यावा. यामुळे विम्याची रक्कम कमी होते.
नो-क्लेम बोनसचा करा वापर- सर्वसाधारणपणे कार विमा काढण्याचा मुख्य उद्देश हा नुकसान भरपाई असतो. मात्र, अगदी लहान लहान नुकसानीसाठी क्लेम केल्यास भविष्यात याचा तोटा होऊ शकतो. यामुळे तुम्हाला विम्याचे नुतनीकरण करताना नो-क्लेम बोनसचा फायदा मिळणार नाही. जर तुम्ही वर्षभरात कोणताही क्लेम न केल्यास अनेक विमा कंपन्या नुतनीकरणावेळी 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देतात. यामुळे विम्याची रक्कम थेट अर्धी होऊ शकते.
मुदत संपण्याआधी करा नुतनीकरण – कार विम्याची मुदत संपण्याआधी नूतनीकरण केल्यास याचा फायदा होऊ शकतो. आधीच नूतनीकरण केल्यास तुम्हाला डिस्काउंट आणि नो-क्लेम बोनसचा देखील फायदा मिळेल. जर तुम्ही मुदत संपल्यानंतर पुन्हा विमा काढायला गेल्यास कोणतेही डिस्काउंट मिळणार नाही.
नुकसान झाल्यास आधी स्वतः खर्च करण्याची तयारी- तुम्ही विमा काढताना कारचे नुकसान झाल्यास सुरुवातीला स्वतः खर्च करण्याची तयारी दर्शवू शकता. याअटी मध्ये आधी खर्च तुम्हाला करावा लागतो व त्यानंतर विमा कंपनी क्लेमची रक्कम देते. तुम्ही या वजावटीची (Deductibles) निवड केल्यास कंपनी देखील विमा काढताना डिस्काउंट देते. मात्र, लक्षात घ्या की गाडीचे जास्त नुकसान झाल्यास तुमची सुरुवातीला दुरुस्तीसाठी खर्च करण्याची तयारी असायला हवी.
अॅड-ऑन कव्हर- कंपन्या विम्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश करत असतात. झिरो डेप्रिसेशनपासून ते इंजिन कव्हरपर्यंत अनेक गोष्टींमुळे विम्याची रक्कम वाढते. त्यामुळे विम्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, हे तुम्ही ठरवू शकता. यामुळे विम्याची रक्कम कमी होईल. महत्त्वाचे म्हणजे कार विमा घेताना कोणती कंपनी कमी रक्कमेत जास्त सुविधा देत आहात, हे पाहा. वेगवेगळ्या विमा कंपन्यांची तुलना करूनच निर्णय घ्या.