Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car Maintenance Tips: या 5 टिप्स फॉलो करा अन् कमी खर्चात नवीन कारसारखा अनुभव मिळवा!

Car Maintenance Tips

Car Maintenance Tips : या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला कमी खर्चात मायलेज आणि नवीन कारसारखा अनुभव तर मिळेलच. त्याचबरोबर तुमच्या कारची स्थिती आणि इंजित सुरक्षित राहील.

कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाची  देखभाल करणे महत्त्वाचे आहे. कारचा मायलेज उत्तम राखणे गरजेचे आहे. कारची योग्य काळजी घेतली नाही तर कुठेही फसगत होऊ शकते. प्रवास करताना अडचणी निर्माण होऊन खर्च वाढू नये म्हणून आपण आज गाडीबाबतच्या काही मेंटेनन्स टिप्स जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या कारचे मायलेज वाढेल आणि इंजिन सुरक्षित राहील.

युजर मॅन्युअल वाचा (Read User Manual)

कार खरेदी केल्यावर सोबत मिळालेले युजर मॅन्युअल काळजीपूर्वक वाचले पाहिजे. यामध्ये कारची वैशिष्ट्य, सोयी-सुविधा, वापरण्याची पद्धत, काय करावे-काय करू नये या गोष्टींची माहिती दिलेली असते. या माहितीच्या आधारे तुम्ही कारमधील किरकोळ गोष्टी दुरुस्त करू शकता. युजर मॅन्युअलची हार्ड कॉपी जर तुमच्या सोबत नसेल तर त्याची ऑनलाईन प्रत सुद्धा वेबसाईटवर उपलब्ध असते.

ऑईल फिल्टर आणि इंजिन स्वच्छ ठेवा (Keep Engine & Oil Filter Clean)

कार चालवताना समस्या येऊ नये म्हणून कारचे इंजिन नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कारमध्ये स्वच्छ इंधन भरून वेळोवेळी इंजिनची  स्वच्छता केल्याने अडचणी निर्माण होत नाहीत. याशिवाय ऑईल फिल्टरची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ऑईल दूषित होण्यापासून वाचवण्यासाठी प्रत्येक कारमध्ये ऑईल फिल्टरची सोय असते, ज्यामुळे ऑईल स्वच्छ राहते.

ब्रेक फ्ल्यूड आणि टायरचे प्रेशर तपासा (Check Tyre Pressure & Break Fluid)

कारचे टायर्स जर व्यवस्थित नसतील तर कार आहे त्या ठिकाणी थांबवावी लागेल. म्हणून, टायरची हवा किती असावी याची माहिती घेऊन टायरमध्ये योग्य हवा ठेवली तर चांगले मायलेज मिळते. बऱ्याच कारमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम उपलब्ध असते. ही सिस्टीम टायरमध्ये कमी हवा असल्यास ड्रायव्हरला वॉर्निंग देते. जर तुमच्याकडे असलेल्या कारमध्ये ही सुविधा नसेल तर वेळोवेळी कारच्या टायरचे प्रेशर तपासणे आवश्यक आहे. ब्रेक फ्ल्यूडचा रंग गडद झाला तर ते बदलले पाहिजे. वाहनाच्या ब्रेकची तपासणी करून ब्रेक फ्ल्यूडची काळजी घेणे गरजेचे असते.

कारमध्ये कमी वजन ठेवा  (Keep Car's Weight Low)

प्रवास करताना कारमध्ये अवजड सामान घेऊन जाणे टाळावे. कारमध्ये जितके कमी वजन असेल तितकी ती व्यवस्थित राहू शकते. कारमध्ये कमी वजन ठेवल्यास कारचा स्पीड आणि मायलेज सुधारण्यास मदत होते.

उत्तम मायलेज ठेवा (Keep Good Mileage)

कारचे मायलेज उत्तम ठेवायचे असेल तर कार योग्यरीत्या चालवणे गरजेचे असते. रॅश ड्रायव्हिंग, सतत गियर्स बदलणे, स्पीड कमी-जास्त करणे, कार सुरु केल्यावर लगेच एसी ऑन करणे, एक्सिलेटर घाईत हाताळणे या गोष्टी टाळल्या नाहीत तर त्याचा मायलेजवर परिणाम होऊ शकतो.

या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला कमी खर्चात मायलेज आणि नवीन कारसारखा अनुभव मिळेल.