Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart Summer Saver Days: फ्लिपकार्ट समर सेव्हर डेज सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर डिस्काउंट

Flipkart Summer Saver Days

Flipkart Summer Saver Days: फ्लिपकार्ट समर सेव्हर डेज सेल13 ते 17 एप्रिल 2023 दरम्यान सुरु राहील. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सनग्लासेस आदी वस्तूंवर देखील 60-70% सवलती दिल्या जात आहेत.

Flipkart Sale: फ्लिपकार्ट या आघाडीच्या ई-कॉमर्स वेबसाईटवर नुकतीच 'फ्लिपकार्ट समर सेवर डेज' या सेलची घोषणा झालीये. आजपासून 17 एप्रिलपर्यंत (13-17 April 2023) हा सेल सुरू असणार आहे.वर्षातून काही खास वेळा फ्लिपकार्टद्वारे अशा सेलचे आयोजन केले जात असते. वेबसाईटनुसार या सेलमध्ये ग्राहकांना एकापेक्षा एक ऑफर्स दिल्या जाणार आहेत. समर स्पेशल सेलमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर 60-70% सवलत दिली जात आहे.

या समर सेव्हर डेज सेलमध्ये स्मार्टफोन (Smartphones), इलेक्ट्रॉनिक उपकरण (Electronic Gazzets), स्मार्ट टीव्ही (Smart Television) आणि कपड्यांवर (Clothing) मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. सोबतच या वस्तूंच्या खूप सगळ्या व्हरायटी देखील ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. समर सेलमध्ये खरेदी करताना जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केलात तर तुम्हाला अतिरिक्त सूट देखील मिळू शकते, अशी माहिती फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर दिली गेली आहे.

कॅशबॅक ऑफर!

Axis Bank क्रेडिट धारकांना या सेलमध्ये खरेदी करताना विशेष सवलत दिली जाणार आहे. Axis Bank Credit Card वापरून EMI नुसार व्यवहार केल्यास इन्स्टंट 10% सूट ग्राहकांना दिली जाणार आहे. तसेच Paytm Wallet चा वापर केल्यास ग्राहकांना 100 रुपये कॅशबॅक देखील दिला जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटवर बघू शकता.

स्मार्टफोनवर मेगा सूट

फ्लिपकार्ट समर सेव्हर डीलमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे बेस्ट फीचर्स असलेले मोबाईल फोन मोठ्या सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Google Pixel 7 Pro, Google Tensor G2 सारख्या महागड्या मोबाईलवर 10% सवलत या सेलमध्ये दिली जाते आहे. सोबतच Poco M4 Pro या मोबाईलवर देखील 10% सवलत दिली जात आहे. स्मार्टफोनचे बरेच ऑप्शन्स वेबसाईटवर उपलब्ध असून 11,999 रुपयांपासून बेस्ट फीचर्ससह ग्राहकांना मोबाईल खरेदी करता येणार आहे. Apple iPhone 11 वर देखील 9% सवलत दिली जाते आहे. 

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील ऑफर्स

उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन फ्लिपकार्टने समर स्पेशल वस्तूंवर मोठी सवलत देऊ केली आहे. सेलमध्ये फ्रीजवर 60% पर्यंत सूट दिली जाते आहे. तसेच एयर कुलरवर 45% पर्यंत सूट दिली जाते आहे. 

सोबतच सन ग्लासेस, ब्रांडेड कपडे आणि स्मार्ट वॉच आदी वस्तूंवर देखील 60-70% सवलत या सेलमध्ये दिली जात आहे.