आपल्यापैकी बऱ्याच जणांना ॲपलची (Apple) इलेक्ट्रॉनिक उत्पादने वापरायला आवडतात. मात्र त्याची किंमत जास्त असल्याने ती सर्वसामान्य लोकांना परवडणारी नसतात. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही. कारण फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आले आहे. या ऑफर अंतर्गत ॲपल कंपनीचा एअरपॉड्स ग्राहकांना फक्त 540 रुपयांत खरेदी करता येणार आहे. ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्टवर (Online retail website Flipkart) ग्राहकांना वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर्स देण्यात येत आहेत. 26000 रुपयांचा हा एअरपॉड ग्राहकांना 540 रुपयांत कसा खरेदी करता येईल, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
फ्लिपकार्टच्या ऑफरबद्दल जाणून घ्या
ॲपल एअरपॉड्स प्रो (Apple AirPods Pro) हे एक ट्रेंडिंग ॲपलचे उत्पादन आहे. ज्याची जगभरात मोठ्या प्रमाणावर विक्री होते. फ्लिपकार्टवर या उत्पादनाची किंमत 26,300 रुपये आहे. या उत्पादनावर फ्लिपकार्टकडून 35 टक्क्यांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट पकडून या उत्पादनाची किंमत 16,990 रुपये होते.
बँक ऑफर्सबद्दल जाणून घ्या
ॲपल एअरपॉड्स प्रो (Apple AirPods Pro) च्या खरेदीवर वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्स देण्यात येत आहेत. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Bank credit card) ग्राहकांनी EMI Transaction केल्यावर त्वरित 1250 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्याशिवाय फ्लिपकार्ट डिस्काउंट कुपनच्या मदतीने या उत्पादनावर 20% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.
540 रुपयांत ॲपल एअरपॉड्स प्रो कसे खरेदी कराल?
फ्लिपकार्टवर ॲपल एअरपॉड्स प्रो (Apple AirPods Pro) च्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर (exchange offer) देण्यात येत आहे. खरेदीदाराला 16,450 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट या अंतर्गत मिळणार आहे. मात्र त्यासाठी त्याला जुने ॲपल एअरपॉड्स एक्सचेंज करावे लागणार आहेत. या एअरपॉड्सच्या स्थितीवर हा डिस्काउंट कमी किंवा जास्त करण्यात येईल. ग्राहकांनी जर एक्सचेंज ऑफर्सचा लाभ घेतला, तर केवळ 540 रुपयांत ॲपल एअरपॉड्स प्रो (Apple Airpod Pro) ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.
फीचर्स जाणून घ्या
पांढऱ्या रंगाच्या ॲपल एअरपॉड्स प्रो (Apple Airpod Pro) ला 1 वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. या एअरपॉड्सच्या दोन्ही बड्सना दोन स्पीकर देण्यात आले आहेत. ॲपल एअरपॉड्स प्रो ची बॅटरी केस प्लास्टिक मटेरियल पासून बनवण्यात आली आहे. हे मटेरियल ग्लॉसी असून प्रीमियम लूक देणारे आहे.यामध्ये नॉईस कॅन्सलेशनची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय ब्ल्यूटुथ कनेक्टर (Bluetooth connector) देखील दिला आहे.
Source: navbharattimes.indiatimes.com