Top Marathi Movie in 2022: मराठी चित्रपट म्हणजे प्रेक्षकांचा अत्यंत जवळचा विषय. यंदा अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांनी अक्षरश: प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आणखी ही काही चित्रपट वर्ष अखेरीस प्रदर्शित होत आहे. यातीलच ‘वेड’ (Ved) हा चित्रपट येण्यापूर्वीच प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. यातील गाण्यांनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. तत्पूर्वी इतर मराठी चित्रपटांनी 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर किती गल्ला कमविला हे पाहूयात.
Table of contents [Show]
पावनखिंड (Pawankhind)
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्र गाजविला. हा चित्रपट 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठया प्रमाणात पसंद केले. या ऐतिहासिक चित्रपटात अभिनेते अजय पूरकर यांनी बाजीप्रभू देशपांडेची प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर साधारण 45 कोटींची कमाई केली.
धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे (Dharamaveer-Mukkam Post Thane)
प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट आहे. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. दिवंगत आनंद दिघे यांच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक पाहायला मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर साधारण 29 कोटी रूपये कमविले.
सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao)
2022 मध्ये मराठी इंडस्ट्रीत ऐतिहासिक चित्रपटांचा तडखा पाहायला मिळाला. हा तडखा प्रेक्षकांना आवडलादेखील भरपूर. असाच प्रवीण तरडे (Pravin Tarade) दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रमुख भूमिका प्रविण तरडे यांनीच साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18.20 कोटींचा गल्ला कमविला.
टाईमपास 3 (Timepass 3)
पाहता, पाहता 2022 मध्ये टाईमपास 3 देखील प्रदर्शित झाला. टाईमपास चित्रपट म्हटले की, आज ही प्राजू व दगडूची जोडी डोळयासमोर येते. याच चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वेलनेदेखील प्रेक्षकांना भुरळ पाडले. रवी जाधव दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 12.15 कोटी मिळविले.
चंद्रमुखी (ChandraMukhi)
चंद्रमुखी या चित्रपटातील चंद्रा गाण्याने संपूर्ण सोशल मिडीया गाजविला. अजून ही या गाण्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये थांबली नाही. चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) व प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतला. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे (Adinath Kothare), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) पाहायला मिळाले. या चित्रपटानेदेखील बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली.