Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या 2022 मधील सर्वाधिक अब्जाधीश असलेला देश!

Forbes

जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींपैकी 8 व्यक्ती या अमेरिकन आहेत. तर सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो.

संपूर्ण जगभरातून, 6 खंडातील आणि एकूण 75 देशांमधील काही भाग्यवान अब्जाधीशांनी फोर्ब्सच्या 36 व्या वार्षिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 2022 मधील या भाग्यवान अब्जाधीशांमध्ये यावर्षी एकूण 2,668 अब्जाधीस मिळाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यात यावर्षीच्या अब्जाधीशांची संख्या कमी झाली आहे. गेल्यावर्षी 2,755 अब्जाधीश सापडले होते.


यावर्षी अब्जाधीशांची संख्या कमी होण्याचे सर्वात मोठे कारण तुम्हाला माहित आहे का? चीनमध्ये पुन्हा एकदा उद्भवलेला कोविड-19 संसर्ग. यामुळे चीनमधील काही भागात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. उत्पादक कंपन्या बंद असल्यामुळे कंपन्यांच्या आणि पर्यायाने कंपनी मालकांच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली. चीन सरकारने टेक्निकल कंपन्यांसाठी आणलेल्या नियमांमुळे आणि बिजिंग आणि रशिया यांच्यातील तीव्र संबंधामुळे चीनमधील बऱ्याच हेवीवेट कंपन्या क्रॅश झाल्या. चीनमधील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये पिंडुओडुओचे माजी अध्यक्ष कॉलिन हुआंग, इंटरनेट जाएंट टेनसेंट होल्डिंग्सचे अध्यक्ष मा हुआतेंग (Ma Huateng) आणि अलीबाबाचे जॅक मा (Jack Ma of Alibaba) यांचा समावेश आहे. चीनमधील एकूण  539 अब्जाधीशांमधून गेल्या वर्षीपासून 87 अब्जाधीश खाली आले. ज्यांची एकूण संपत्ती 2 ट्रिलियन डॉलर एवढी होती. तरीही चीन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अब्जाधीश असलेला देश आहे.

most billionaires country in the world 2022

अब्जाधीशांची संख्या कमी करणारा किंवा त्यांना पळवून लावणारा आणखी एक देश म्हणजे, रशिया. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladmimir Putin) यांनी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरून रशियावर खूप सारे निर्बंध येऊ लागले. परिणामी फेब्रुवारीमध्ये रशियाचे मार्केट खाली आले. यामुळे या वर्षात रशियातील 34 अब्जाधीश कमी झाले. रशियाच्या चलनाचे जागतिक पातळीवर अवमूल्यन झाल्यामुळे रशियातील अब्धाधीशांच्या संपत्तीत घट झाली. रशियातील एकूण अब्जाधीशांची संपत्ती 584 अब्ज डॉलरवरून यावर्षी 320 अब्ज डॉलर इतकी झाली. सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये तेल व्यापारी वागीट अलेकपेरोव्ह (Vagit Alekperov) आणि अलेक्सी मोर्दशोव्ह (Alexey Mordashov) यांचा समावेश आहे. हे पूर्वी रशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होत्या.

forbes worlds billionaries list-1

जगातील पहिल्या 5 देशांमध्ये असलेल्या अब्जाधीशांच्या संख्येत बदल झाला. पण सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक 735 अब्जाधीश असलेल्या अमेरिकेमध्ये मात्र अब्जाधीशांची कमी नाही. सध्या संपूर्ण जगात अमेरिका हा अब्जाधीशांसाठी आघाडीचा देश मानला जातो. एका वर्षापूर्वी अमेरिकेत 724 अब्जाधीश होते. त्यात वाढ होऊन आता 735 झाले आहेत. या 735 अब्जाधीशांची एकूण संपत्ती 4.7 ट्रिलियन डॉलर आहे. जी मागच्या वर्षी 4.4 ट्रिलियन एवढी होती. 

जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींपैकी 8 व्यक्ती या अमेरिकन आहेत. यात पहिल्या क्रमांकावर इलॉन मस्क (Elon Musk) हे आहेत; त्यांची एकूण संपत्ती 219 अब्ज डॉलर एवढी आहे.

या सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे. या यादीत यावर्षी 26 जणांचा समावेश झाला आहे. तर चार नवीन अब्जाधीशांमुळे तैवानने यावर्षी पहिल्या दहामध्ये क्रमांक पटकावला आहे. तर उरुग्वे, एस्टोनिया, बल्गेरिया आणि बार्बाडोस या चार देशांकडे गेल्या वर्षी अब्जाधीश नव्हते. त्यांच्याकडे आता फोर्ब्सच्या यादीत किमान एक अब्जाधीश आहे.

image source - https://bit.ly/3OIJ9iz