Subsidy Scheme: केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवितात. जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक मदत व्हावी. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना गाई गोठा योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते.
आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई,म्हशी,शेळी, कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाच ठिकाण नसत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्याच्यासमोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना अत्यंत महत्वाची ठरते.
Table of contents [Show]
गोठा बांधणी अनुदान 2023 योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि अटी
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे
- प्रत्येक योजनेच्या अनुदानासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच घेता येईल.
- या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येईल.
- शेतकऱ्याने जर या आधी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या एख्याद्या योजनेअंतर्गत,
- गाय, म्हैस व शेळी साठी शेड बांधून घेतली असेल तर त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
गाय गोठा अनुदान योजना
महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेत गाईगुरांना गोठा बांधून देण्यासाठी अनुदान देतात. 17 मार्च 2023 ला मिळालेल्या माहितीनुसार, गाई गुरांचे शेण आणि मूत्र यामुळे सेंद्रिय खत तयार होते. पण जनावर जर बाहेर असतील तर त्यांचे शेणखत वाया जाते म्हणून जनावारांसाठी गोठा तयार करण्याचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. त्यासाठी अनुदान पुढीलप्रमाणे दिले जाते.
अकुशल खर्च 8 टक्के = 6188
कुशल खर्च 92 टक्के = 71000
एकूण खर्च 100 टक्के = 77188
योजनेच्या अटीमध्ये बदल करण्यात आला..
गाय गोठा योजनेमध्ये जनावरांची ट्रॅकिंग करणे आवश्यक होते. पण, एखाद्या संस्थेकडून मिळालेली जनावरे किंवा कर्ज काढून घेतलेली जनावरे यांनाच ट्रॅकिंग करता येत होते. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेतून वंचित राहत होते. म्हणून या योजनेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जनावरे ट्रॅकिंग न करता गावातील तलाठी यांच्या कडून तुमच्याकडे असलेल्या जनावरांची संख्या लिहून असलेला दाखला घेण्यात यावा. ग्राम सेवक यांनी सुद्धा पंचनामा करून आकडेवारी नोंदवली तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. पंचनामा करतांना गावातील सरकारी शाळेचे शिक्षक किंवा मग इतर कर्मचारी असणे आवश्यक आहे. अशी नवीन अट या योजनेत नोंदवण्यात आली आहे.
गाय गोठा अनुदान योजनेंतर्गत आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड | जन्माचे प्रमाणपत्र |
रेशन कार्ड | जातीचे प्रमाणपत्र |
पासपोर्ट आकाराचा फोटो | इतर कोणत्या योजनेचा न घेतल्याचे घोषणापत्र |
वार्षिक उत्पन्नाचा दाखला | जागेचे ना हरकत प्रमाणपत्र |
मतदान कार्ड | ग्रामपंचायत शिफारस पत्र |
मोबाईल क्रमांक | अल्पभूधारक प्रमाणपत्र |
ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा | जॉब कार्ड |
गाय गोठा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अर्जदाराने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा. किंवा अधिकृत वेबसाइटवरुन माहिती घ्यावी. अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा व अर्ज सादर केल्यावर अर्जाची पोचपावती घ्यावी. अशा प्रकारे तुमची गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
(News Source https://mahasarkariyojana.in)