Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Financial Year: दैनंदिन गरजांमध्ये आजपासून झालेले 'हे' 10 बदल तुम्हाला माहिती असायलाच हवेत!

Rules Changed

Changes from 1 April 2023 : आज 1 एप्रिल, आर्थिक वर्षाचा पहिला दिवस. आजपासून कर आणि टोलसह अनेक नियम बदलले आहेत. तसेच नवीन कर प्रणालीमध्ये नवीन स्लॅब तसेच दैनंदिन जिवनाशी निगडीत अनेक बदल आजपासुन लागू झालेले आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत ते बदल. आणि या बदलाचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे ते.

Rules Changed From Today 1 April : आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 (FY24) सुरू झाले आहे. हे आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत असेल. या आर्थिक वर्षात अनेक नियम बदलले आहेत. ज्यामध्ये तब्बल 10 नियमांचा समावेश आहे. कोणकोणत्या ते जाणून घेऊया.

1.डेट म्युच्युअल फंडांवर LTCG लाभ मिळणार नाही

आज 1 अप्रिल पासुन डेट म्युच्युअल फंडामध्ये (Debt Mutual Fund) केलेल्या गुंतवणुकीवर म्हणजेच अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर आकारला जाईल. यामुळे येथे गुंतवणूकदारांना लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) चा लाभ मिळणार नाही.

2. एलटीए (Leave Travel Allowance)

अशासकीय कर्मचाऱ्यांना म्हणजेच ज्यांना सरकारी नोकरी नाही अश्या कर्मचाऱ्यांना कुठलेही पैसे न कापता रजा दिली जाते. वर्ष 2002 पासुन ते आतापर्यंत ही मर्यादा 3 लाख रुपये होती आणि आता ती मर्यादा 25 लाख रुपये करण्यात आलेली आहे.

3. ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचा दिवस

1 एप्रिल पासुन ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी (SCSS) कमाल ठेव मर्यादा 15 लाखांवरून 30 लाख रुपये एवढी वाढविण्यात आली आहे. तर  ज्येष्ठ नागरीकांच्या दोघांपैकी कोणाच्याही एका खात्यासाठी मासिक उत्पन्न योजनेसाठी कमाल ठेव मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये करण्यात आलेली आहे. तर पती-पत्नी दोघांच्याही संयुक्त खात्यांसाठी ही मर्यादा 7.5 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात आलेली आहे.

4. टोल महागला

आजपासून देशभरातील काही निवडक महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील टोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला टोल टॅक्समध्ये वाढ केली जाते. ही वाढ अनेक निकषांवरुन ठरवली जाते. मुंबई पुणे एक्सप्रेसचा टोल आजपासून 18% ने वाढला.

5. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली

१ एप्रिल 2023 पासून म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-2024 साठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख रुपये झाली आहे. या आर्थिक वर्षात ज्या व्यक्तीचे उत्पन्न सात लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना त्यांच्या उत्पन्नावर कुठलाही कर द्यावा लागणार नाही. कारण,नवीन कर प्रणालीमध्ये, आयकर कायद्याच्या कलम 87A अंतर्गत उपलब्ध कर सवलत 12,500 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

6. नवीन कर रचना लागू

नवीन आयकर स्लॅब देखील १ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत. नवीन कर प्रणाली अंतर्गत 2023च्या अर्थसंकल्पात आयकर स्लॅब मध्ये झालेल्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आयकर स्लॅबची संख्या 6 वरून 5 करण्यात आली आहे.

7. आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य

१ एप्रिल २०२३ पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य झाले आहे. आजपासून फक्त 6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध ठरविल्या जाईल. म्हणजेच आता 4 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असलेले दागिने विकता येणार नाहीत. तसेच, भौतिक सोन्याचे ई-गोल्ड पावतीमध्ये रूपांतर करण्यावर कोणताही कर नाही

8. व्यावसायिक गॅस सिलेंडर झाला स्वस्त

एलपीजी सिलेंडरच्या किमती दर 15 दिवसांनी निश्चित केल्या जातात.आजपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा बदल करण्यात आले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी गॅसच्या दरात 92 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दरात कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही.

9. स्टँडर्ड डिडक्शन 

जुन्या कर प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या 50,000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनमध्ये (प्रमाणित वजावट) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेन्शनधारकांसाठी,अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणालीमध्ये मानक कपातीचे फायदे आणण्याची घोषणा देखील यावर्षीच्या आर्थिक संकल्पात केली होती. यावरुन 15.5 लाख किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या प्रत्येक पगारदार व्यक्तीला 52,500 रुपयांचा लाभ मिळणार आहे.

10. रेपो दरात वाढणार

 रिझर्व्ह बँकेचे नव्या वर्षातील पतधोरण पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. महागाईचा वाढता आलेख पाहता रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.